Chips Affect Memory : चिप्स तुमच्या मेंदूवर करतायेत हल्ला; नव्या अभ्यासातून पॅकेट फूडचं धक्कादायक वास्तव समोर

Chips Bad for Brain: अनेकांना वाटतं की, कधी कधी अशा प्रकारे पॅकेट स्नॅक्स खाल्ल्याने काही त्रास होत नाही. मात्र नव्या संशोधनानुसार वेगळीच माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Do Chips Affect Memory : आजकाल पॅकेट स्नॅक्स आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत. ऑफिसमध्ये भूक लागली की चिप्स, चहासोबत बिस्कीट किंवा घाईघाईत इन्स्टंट नूडल्स हे सर्व पदार्थ जीवनाचा भाग बनले आहेत. अनेकांना वाटतं की, कधी कधी अशा प्रकारे पॅकेट स्नॅक्स खाल्ल्याने काही त्रास होत नाही. मात्र नव्या संशोधनानुसार वेगळीच माहिती समोर आली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स उदा. चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेट स्नॅक्स खाल्ल्याने मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. संशोधनानुसार, दररोज अतिरिक्त प्रमाणात पॅकेट स्नॅक्स खाल्ल्याने स्मरणशक्ती कमकुवत होते, याशिवाय एकाग्रतेवरही परिणाम होतो. इतकच नाही तर डिमेन्शियाचाही धोका वाढू शकतो. याचा अर्थ तुमच्या खाण्याच्या छोट्या छोट्या सवयी भविष्यात मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. 

Advertisement


अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड काय असतं?

अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांवर फॅक्टरीमध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्यानंतर तयार केल्या जातात. यामध्ये चव वाढविण्यासाठी अधिक मीठ, साखर, Preservatives  आणि Artificial फ्लेवर्स मिसळले जातात. चिप्स, पॅकेटमधील बिस्किट, इन्स्टंट नूडल्स, Sugary cereals, प्रोसेस्ड मीट आणि सॉफ्ट ड्रिंक्स याची मोठी उदाहरणं आहेत. यामुळे अन्नात चव येते, मात्र शरीर आणि मेंदूवर हळूहळू परिणाम होऊ शकतो. 


अभ्यासात काय आलं समोर?

नव्या अभ्यासानुसार, ज्या लोकांच्या आहारात अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स जास्त होते त्यांच्यात स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होण्याची भीती असते. संशोधनात असंही दिसून आलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या आहारात अशा पदार्थांचा केवळ १०% वाटा असेल, जे अंदाजे चिप्सच्या एका पाकिटाएवढे आहे, तर स्मृतिभ्रंशाचा धोका वाढू शकतो. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे याचा धोका हळूहळू वाढत राहतो. म्हणजे जितकं जास्त जंक फूड तितका धोका जास्त. हा अभ्यास मोनाश विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. हा अभ्यास जर्नल अल्जायमर्स अँड डायमेंशिया: डायग्नोसिस, असेसमेंट अँड डिजीज मॉनिटरिंग मध्ये प्रसिद्ध झाला आहे. 

Photo Credit: iStock

मेंदूवर कसा होतो परिणाम?

संशोधकांनुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स शरीरात सूज वाढवू शकते, ज्याचा थेट परिणाम मेंदूवरही होतो. अशा पदार्थांमध्ये पोषक तत्व कमी असतात आणि अनहेल्दी फॅट्स अधिक असतात. 

अभ्यासानुसार, अतिरिके पॅकेट फूडचं सेवन करणाऱ्यांमध्ये ध्यान करणं, एकाग्रतेत अडथळा येतो. मानसिक प्रतिक्रिया हळू झाल्यासारखे संकेत मिळतात. सुरुवातील हे बदल लहान वाटत असले तरी भविष्यात गंभीर न्यूरोलॉजिकल समस्यांचं कारण ठरू शकतं. 

Advertisement


फळं-भाज्या खाणं पुरेसं नाही...

रिसर्चनुसार, जे लोक हेल्दी पदार्थ खाण्याबरोबरच नियमितपणे पॅकेट स्नॅक्स खात असतील त्यांच्यातही हा धोका पाहायला मिळाला. याचा अर्थ केवळ फळं आणि भाज्या खाऊन चालणार नाही, तर जंक आणि प्रोसेस्ड फूड्स प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. 


चांगला पर्याय का आहे?

तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, पूर्णपणे जंक फूड सोडणं प्रत्येकासाठी सोपं नाही. मात्र याचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. जिप्सच्या ऐवजी फळ, तळलेल्या स्नॅक्सऐवजी ड्राय फ्रूट्स आणि इन्स्टंट फूडपेक्षा घरातील ताजं अन्न खाणं चांगला पर्याय आहे. जीवनशैलीतील लहान लहान बदल भविष्यात शरीर आणि मेंदू दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकतात. 

Advertisement

मेंदूचं आरोग्य अचानक खराब होत नाही, तर दररोजच्या सवयींमुळे हळूहळू परिणाम होतो. एक चिप्सचं पॅकेट त्या वेळी नुकसानदायी वाटत नाही, मात्र वर्षानुवर्षे अशा सवयी राहिल्या तर भविष्यात मोठी समस्या ठरू शकते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)