Cold Food and Stomach Trouble: आजकाल धकाधकीच्या जीवनात फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न गरम न करता खाल्लं जातं. काहीजण सकाळचं शिल्लक राहिलेलं अन्न रात्री किंवा रात्रीचं अन्न दुसऱ्या दिवशी सरळ फ्रीजमधून बाहेर काढून खातात. काही तर पिझ्झा, भात, डाळ आणि भाजी गरम न करता खाल्लं जातं. मात्र वारंवार थंड अन्न खाणं तुमच्या शरीरासाठी धोकादायक असतं हे तुम्हाला माहीत आहे का? अन्न नीट गरम न केल्याने आणि बराच काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया वाढू लागतो. हे बॅक्टेरिया पोटाचे आजार निर्माण करू शकतात.
कोणत्या आजारांचा धोका?
वारंवार थंड किंवा व्यवस्थित गरम न केलेलं अन्न खाल्ल्याने Gastritis म्हणजेच पोटाच्या आतील थरात सूज येण्याची समस्या वाढू शकते. मायो क्लिनिकनुसार, फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न ३ ते ४ दिवसांहून अधिक काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने आणि व्यवस्थित गरम न करता खाल्ल्याने फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो. बॅक्टेरिया ४ ते ६० डिग्री तापमानात वाढतात.
Gastritis काय आहे ?
गॅस्ट्राइट्समध्ये पोटाचे आतील आवरणात सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते. यामध्ये टाकाऊ किंवा दूषित अन्नाचा समावेश आहे. बराच काळ हीच स्थिती राहिली तर अल्सरसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
थंड अन्नामुळे पोटाचं आरोग्य कसं बिघडतं? l How Does Cold Food Increase Stomach Problems?
पचन क्षमता कमकुवत होते...
थंड अन्न खाल्ल्याने पचन अग्नि कमी होतो. यामुळे चांगल्या पद्धतीने पचन होत नाही. याशिवाय गॅस, जडत्व आणि अपचनाची समस्या उद्भभवते.
बॅक्टेरियाचा धोका
अन्न बराच काळापर्यंत बाहेर ठेवलं असेल किंवा फ्रीजमध्ये बराच दिवस अन्न ठेवलं तर त्यात धोकादायक बॅक्टेरिया वाढतात. अशा अन्नातून विषबाधा आणि पोटात संसर्गाचा धोका वाढतो.
अॅसिडिटी आणि अपचन...
वारंवार थंड अन्न खाल्ल्याने पोटातील अॅसिडचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे खरपट ढेकर, जळजळ आणि छातीत दुखण्यासारख्या समस्या उद्भवतात.
काही लोकांमध्ये, सततच्या वाईट खाण्याच्या सवयींमुळे, IBS सारख्या समस्या देखील वाढू शकतात, ज्यामध्ये पोटदुखी, अतिसार किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कायम राहतात.
काय कराल?
- जेवणापूर्वी अन्न नेहमी चांगलं गरम करा.
- शिल्लक राहिलेलं अन्न २४ तासांपेक्षा जास्त काळ ठेवू नका.
- तेच अन्न वारंवार गरम करणे टाळा.
- ताजे, घरगुती अन्नाला प्राधान्य द्या.
- पचन सुधारण्यासाठी कोमट पाणी प्या.