तुम्ही रात्री 8 वाजेनंतर जेवताय? पोट आणि आतड्यांवर होतोय 'हा' दुष्परिणाम, तज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक वास्तव

Acidity And Constipation Causes: पोटाच्या वाढत्या समस्यांवर डॉ. रुचा पै यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. पचन कसे बिघडते आणि आयुर्वेदानुसार कोणते 3 बदल करावेत, हे जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Acidity And Constipation Causes: पोटाच्या समस्या निर्माण होण्यामागील गंभीर कारण"
Canva

Acidity And Constipation Causes: बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल प्रत्येकालाच पचनाच्या समस्या भेडसावत आहेत. आपण काय खातो यापेक्षा ते 'कधी' आणि 'कसे' खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून असते. चुकीच्या वेळी जेवणे, अपुरी झोप आणि मैद्याच्या पदार्थांचे अतिसेवन यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. या रोजच्या किरकोळ वाटणाऱ्या चुका भविष्यात मोठ्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात. निरोगी पचनसंस्थेसाठी आपल्या दैनंदिन सवयींमध्ये कोणते सोपे बदल करणे आवश्यक आहे, याविषयीची डॉ. रुचा पै यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...

डॉ. रुचा पै यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की,"सांगा... प्रामाणिक रात्री ८ च्या आधी जेवण कधी केलं? तुमचं पोट रोज हेच सहन करतंय. भारतीय सामान्य चुकीच्या वेळी खातो, चुकीच्या वेळी झोपतो, पाणी सोडून सगळं पितो – आणि म्हणतो "सगळं normal आहे." आज जे दुर्लक्ष करतोय... उद्या तोच मोठा त्रास होऊ शकतो. गॅस, अ‍ॅसिडिटी (acidity), पोट फुगणे (bloating) हे फक्त सुरुवात आहे.

Advertisement

तुमच्या 'या' 6 चुका तुमचं पचन बिघडवतात

  1. उशीरा जेवणे
  2. जेवण न करणे  
  3. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ
  4. कमी पाणी पिणे
  5. आहारात फायबराचा समावेश नसणे 
  6. अनियमित झोप

1. रात्री उशीरा जेवणं

रात्री 9 वाजेनंतरचं अन्न नीट पचत नाही. ते आतड्यात आंबते (ferment). यामुळे गॅस, पोट फुगणे (bloating), अ‍ॅसिडिटी (acidity) या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

2 . जेवण न करणं

अनियमित जेवणामुळे आतड्यांना confusion होते. यामुळे पोटात मुरडा, गॅस आणि IBS यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

3. रोज प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे

बिस्किटं, चिप्स, नूडल्स – शून्य पोषण, भरपूर Preservativesचे सेवन केल्यास तुमच्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरिया नष्ट होतात.

(नक्की वाचा : Stomach Cleaning Tips: सकाळी पोट होईल एका झटक्यात स्वच्छ होईल, गाढ झोपही येईल! फक्त दुधात या 3 मिक्स करून प्या)

4. कमी पाणी पिणे

तीव्र स्वरुपातील डिहायड्रेशनमुळे बद्धकोष्ठता (dehydration), फिशर (fissures) आणि मूळव्याध (piles) यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

5. आहारात अजिबातच फायबर नसणे

मैदा, पांढरा भात, सॅलड नाही. फायबरयुक्त आहार नसेल तर शरीरात टाकाऊ पदार्थ साचून राहतात, ते कडक होतात आणि आतड्यांना इजा होऊ शकते.

6. अनियमित झोप 
कमी किंवा झोपेच्या चुकीच्या पद्धतीमुळे आतड्यांमध्ये दाह (inflame) निर्माण होतो, bowel rhythm बिघडतो, अ‍ॅसिडिटी acidity आणि IBS यासारख्या समस्यांसाठी कारणीभूत होऊ शकते.

Advertisement

(नक्की वाचा: High Uric Acid Symptoms: युरिक अ‍ॅसिड वाढलंय? युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि 5 रामबाण उपाय)

मग काय करायचं?
आयुर्वेदानुसार 3 साधे बदल करा:

  • वेळेवर जेवा
  • पाणी प्या
  • घरगुती उपाय

डॉ. रुचा पै यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा 

Advertisement

1. रात्री 8 वाजेपूर्वी जेवण करा

सूर्यास्तापूर्वी किंवा रात्री 8 वाजेपूर्वी जेवल्यास पचन सुधारू शकतं. जेवणानंतर 100 पावलं चाला.

2. दिवसभर पाणी प्या

कोमट पाण्याचे छोटे छोटे घोट घ्या. थंड पाणी पिणे टाळा, यामुळे अग्नी मंद होऊ शकतो. 

3. घरगुती उपाय

  • जेवणानंतर हे एक करा
  • एक चमचा ओव्याचं पाणी
  • किंवा आल्याचा रस + लिंबू

दुपारी जेवणानंतर घ्या

पचन सुधारण्यास आणि गॅस कमी होण्यास मदत होऊ शकते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)