- आयुर्वेद तज्ज्ञ सुधीर अष्टा म्हणतात की, दारू नेहमी कोणत्याही भेसळीशिवाय नीट पिणे योग्य ठरते
- मद्यपानानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे भरपूर पाणी, नारळपाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स आवश्यक आहे
- हँगओव्हर टाळण्यासाठी आल्याचा चहा किंवा मध मिसळलेले कोमट पाणी पिणे पोटाला आराम देते
आरोग्य तज्ज्ञ नेहमीच मद्यपानापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मात्र, मद्यप्रेमींसाठी दारू एखाद्या औषधापेक्षा कमी नसते. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ सुधीर अष्टा यांनी दारू पिण्याची योग्य पद्धत आणि त्यानंतर घ्यायची काळजी यावर भाष्य केले आहे. त्यांच्या मते, चुकीच्या पद्धतीने केलेले मद्यपान शरीरासाठी अधिक घातक ठरू शकते. अनेक लोकांना दारू पिण्याची योग्य पद्धतच माहित नाही. त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ याबाबत काही सल्ले देतात. त्यांचा हा सल्ला महत्वाचा ठरू शकतो.
पाणी की सोडा? काय आहे योग्य पद्धत?
अनेकजण दारूमध्ये पाणी किंवा सोडा मिसळून पितात. मात्र, सुधीर अष्टा यांच्या मते ही पद्धत चुकीची आहे असं सांगितलं आहे. त्यांनी सुचवले आहे की, दारू नेहमी 'नीट' (Neat) म्हणजेच कोणत्याही भेसळीशिवाय प्यावी. विना भेसळ मद्यपान केल्यास त्याचा आनंद घेता येतो. शिवाय शरीरावरील दुष्परिणाम कमी होतात असा त्यांचा दावा आहे. मात्र, हे करत असताना प्रमाणाचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान फायद्या ऐवजी नुकसानच करते. त्यामुळे असं करताना दारूचे प्रमाण यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
मद्यपानानंतर काय करावे?
दारू प्यायल्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. हँगओव्हर टाळण्यासाठी नारळ पाणी, इलेक्ट्रोलाइट्स किंवा लिंबू पाण्याचे सेवन करावे. तसेच आल्याचा चहा किंवा कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने पोटाला आराम मिळतो. अनेक जणांना दारू घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी भयंकर त्रास होतो. त्यावर हा रामबाण उपाय समजला जातो. जास्त पाणी पिणे हे जास्त परिणामकारक समजले जाते.
हिवाळ्यात कोणती दारू प्यावी?
हिवाळ्याचा कडाका वाढला की अनेकजण शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी मद्यपानाचा आधार घेतात. विशेषतः थंडीच्या दिवसात 'रम' (Rum) पिण्याला अनेकांची पसंती असते. लोकांचा असा समज आहे की, रम प्यायल्याने शरीर उबदार राहते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. त्यामुळे या काळात रमची विक्रीही वाढलेली ही दिसते. अनेक मद्यपान करणारे या काळात रम पिण्यावरच भर देतात.
तज्ज्ञांचे मत काय?
मात्र, आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते हा केवळ एक गैरसमज आहे. मद्यपानामुळे तात्पुरते गरम वाटत असले, तरी ते शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यास मदत करत नाही. उलट, अल्कोहोलमुळे शरीरातील रक्तवाहिन्या विस्तारतात, ज्यामुळे शरीरातील खरी उष्णता वेगाने बाहेर पडते. त्यामुळे हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी दारूचा आधार घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.