Paper Cup for Tea : पेपर कपमधील कटिंग चहा हळूहळू तुम्हाला आजारी करतोय? इको-फ्रेंडली कपाचं धक्कादायक वास्तव

International Tea Day : नेमकं काय आहे या कपामागचं विज्ञान आणि तो आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो. आज आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या निमित्ताने डोळ्यात अंजन घालणारा अत्यंत महत्त्वाचा लेख.

जाहिरात
Read Time: 3 mins

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

Is tea in paper cups safe? : गरमागरम चहा आणि हातात पेपर कप…आपल्या दैनंदिन आयुष्यातली ही नेहमीचीच सवय. प्लास्टिक बंदीनंतर पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पेपर कपचा वापर झपाट्याने वाढतोय. पण या इको-फ्रेंडली कपामागील एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नेमकं काय आहे या कपामागचं विज्ञान आणि तो आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो. आज आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या निमित्ताने डोळ्यात अंजन घालणारा अत्यंत महत्त्वाचा लेख.

पेपर कप खरंच सुरक्षित असतात का? 

रेल्वे स्टेशनवरचा गरमागरम चहा...बसस्थानकावरील कटिंग…ऑफिसमधला ब्रेक…कॉलेज कॅम्पसमधील गप्पांचा अड्डा… आणि या सगळ्यांत एक कॉमन गोष्ट म्हणजे हातातला तो छोटासा पेपर कप. प्लास्टिकवर बंदी आली आणि आपोआप पेपर कप हीरो बनला. पर्यावरणपूरक म्हणत या कपाकडे डोळे झाक करीत असाल तर थोडं थांबा. हा पेपर कप खरंच सुरक्षित असतात का? तुम्ही जो चहा पिताय त्या कपाच्या आतल्या थरात एक सिक्रेट आहे. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बाहेरून कागद, पण आतून प्लास्टिकचा अतिशय पातळ स्तर, आणि जेव्हा गरम चहा त्या कपमध्ये ओतला जातो, तेव्हा सुरू होते केमिकल स्टोरी. संशोधनानुसार, गरम पेयामुळे हा थर वितळतो आणि मायक्रोप्लास्टिकचे कण चहात मिसळू शकतात.

Advertisement
भारतात या विषयावर सर्वात चर्चेत आलेले संशोधन आयआयटी खरगपूरने केलं आहे. 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 85 ते 90 अंश तापमानाचे गरम पाणी फक्त 15 मिनिटे पेपर कपमध्ये ठेवल्यास एका कपातून तब्बल 25 हजार मायक्रोप्लास्टिक कण बाहेर पडू शकतात. संशोधकांच्या मते, दिवसाला तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात 75 हजारांहून अधिक मायक्रोप्लास्टिक कण जाऊ शकतात.

नक्की वाचा - Summer Food : मे महिन्यात चुकूनही 'या' 3 भाज्या खाऊ नका; उन्हाळ्यात कोणत्या भाज्या टाळाल, काय खायला हवं?

पेपर कपच्या रचनेनुसार....

बाहेरून कागद, आतील बाजूस प्लास्टिक कोटिंग. गरम पेयामुळे यात रासायनिक प्रक्रिया घडते. ज्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडण्याची शक्यता असते. गोष्ट इथंच थांबत नाही. या कपातून फक्त प्लास्टिक नाही तर शिसं, क्रोमियम, कॅडमियम, आर्सेनिक सारखे धातूंचे अंशही चहात मिसळत असल्याचं संशोधनात आढळलंय. हे सर्व घटक शरीरासाठी त्रासदायक आहेत. पेपर कपांचा थेट कर्करोगाशी संबंध अद्याप सिद्ध झालेला नाही. मात्र, मायक्रोप्लास्टिक्स आणि PFAS सारख्या रसायनांचा दीर्घकाळ संपर्क शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो, असं काँमहेड आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. उदय बोधनकर यांनी सांगितल

PFAS… म्हणजे फॉरेव्हर केमिकल्स. एकदा शरीरात गेलं की, लवकर बाहेर पडत नाही. काही संशोधन सांगतात यांचा संबंध कॅन्सर, हार्मोनल बदल, थायरॉईड आणि प्रजनन समस्यांशी असू शकतो. म्हणजे चहाचा एक घोट आणि शरीराच्या आतमध्ये एक भयानक प्रोसेस सुरू होतं. भविष्यातील एक मोठं हेल्थ क्रायसिस ठरू शकतं, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पूर्वी कर्करोगासारखे असाध्य आजा उतार वयात जडले जात होते. पण आता तरुणही त्याच्या विळख्यात सापडताना दिसत आहे. तंबाखू, सुपारी, बदलती लाइफस्टाइल आणि आता त्यात पर्यावरणातील रासायनिक प्रदूषणाची भर पडली आहे.

‘Bring Your Own Cup' ट्रेंडही जोरात

मायक्रोप्लास्टिक्सचा मानवी शरीरावर नेमका परिणाम किती गंभीर आहे, यावर अजून संशोधन सुरू आहे... पण सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, असंही डॉ. उदय बोधनकर यांनी सांगितलं. मग काय करायचं…? चहा सोडायचा…? याची गरज नाही. पण कप बदलायचा…! स्टीलचा ग्लास, काचेचा कप, मातीचा कुल्हड हे पर्याय अधिक सुरक्षित मानले जातात. आता सोशल मीडियावर ‘Bring Your Own Cup' ट्रेंडही जोरात सुरू आहे. म्हणजेच… चहा तोच…पण स्टाईल जरा हेल्दी…! पेपर कपांमुळे थेट कर्करोग होतो, हे अद्याप वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. मात्र, मायक्रोप्लास्टिक्स आणि रासायनिक घटकांचा वाढता धोका आता दुर्लक्षित करता येणार नाही.

Advertisement