Alcohol Heart Attack Risk: रोज 1 ग्लास दारू पिणंही पडेल महाग, हृदयाची धडधड होईल बंद अन्... धक्कादायक खुलासा

Alcohol Heart Attack Risk: रोज फक्त एक ड्रिंक किंवा कमी प्रमाणात दारू पिणे देखील आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Alcohol Heart Attack Risk:रोज दारूचा एक पेग पिणंही खतरनाक!"
Canva

Alcohol Heart Attack Risk: रोज दारूचा एक ग्लास पिणे देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते, यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. या गोष्टी भविष्यात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे कारण ठरू शकतात. 'हायपरटेंशन' (अमेरिकन हार्ट असोसिएशनचे एक जर्नल) मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासामध्ये (Study) अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियामधील सुमारे 19,548 पेक्षा जास्त लोकांच्या डेटाचा समावेश करण्यात आला होता. दारू पिणे आणि रक्तदाब वाढणे यामध्ये काय संबंध आहे? हे समजून घेण्यासाठी या लोकांच्या आरोग्याचा अनेक वर्षांपर्यंत ट्रॅक ठेवण्यात आला. 

दारू आणि रक्तदाबाचा थेट संबंध आहे का?

संशोधकांना असे आढळून आले की, दारूचे प्रमाण आणि रक्तदाब यांच्यात थेट संबंध आहे. जसे-जसे दारू पिण्याचे प्रमाण वाढते, तसतसे सिस्टोलिक रक्तदाब (हृदयाद्वारे शरीरात रक्त पंप करण्याचा दाब) देखील वाढतो.

Advertisement

कमी दारू पिण्याचाही धोका

संशोधनानुसार कमी प्रमाणात दारू पिणाऱ्या लोकांमध्येही रक्तदाबात सौम्य पण सातत्याने वाढ नोंदवली गेली. याचा अर्थ असा आहे की, जरी सुरुवातीच्या काळात हा बदल खूप मोठा वाटत नसला तरी दीर्घकाळात यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण वाढवू शकतो. ही परिस्थिती पुढे जाऊन हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित अन्य आजारांचे कारण बनू शकते.

पुरुष आणि महिलांवर वेगवेगळा परिणाम

याशिवाय अभ्यासात असेही दिसून आले की पुरुषांमध्ये डायस्टोलिक रक्तदाब (जो हृदयाच्या दोन ठोक्यांमधील रक्तवाहिन्यांमधील दाब मोजतो) वाढला, तर महिलांमध्ये हा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला नाही. हा निष्कर्ष 'मिरर'च्या रिपोर्टमध्येही समोर आला आहे.

(नक्की वाचा: Monsoon Diet Tips: पावसाळ्यात चुकूनही या 3 भाज्या खाऊ नका, वाढेल आजारांचा धोका! अपोलो हॉस्पिटलचा मोठा इशारा)

रीसर्चमधील माहिती काय सांगते? 

या संशोधनाचे प्रमुख लेखक प्रोफेसर मार्को विंसेटी, जे युनिव्हर्सिटी ऑफ मोडेना अँड रेजियो एमिलियाशी संबंधित आहेत आणि बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये एडजंक्ट प्रोफेसरही आहेत. विंसेटी यांनी सांगितले की, "कमी प्रमाणात दारू प्यायल्यानंही रक्तदाबात नकारात्मक बदल होऊ शकतात हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. दारू न पिणाऱ्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात दारू पिण्याचे कोणतेही फायदेशीर परिणाम आम्हाला आढळले नाहीत."

प्रोफेसर विंसेटी यांनी असेही म्हटले की, दारू हे रक्तदाब वाढवण्याचे एकमेव कारण नाही, पण त्याचा प्रभाव खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच त्यांनी सल्ला दिला की मर्यादित प्रमाणात दारू प्यायला पाहिजे आणि शक्य असल्यास ते पूर्णपणे टाळणे अधिक चांगले आहे.

Advertisement

(नक्की वाचा: How To Quit Smoking:वीकेंडला दारू अन् रोज 2 सिगारेट पिता? आधी कोणती सवय सोडावी? एम्सच्या डॉक्टरांनी दिला सल्ला)

तज्ज्ञांचे मत

ट्युलाने युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्रोफेसर पॉल व्हेलन, जे वर्ल्ड हायपरटेंशन लीगचे अध्यक्षही आहेत, त्यांनी या संशोधनाचे विश्लेषण करताना सांगितले की, संशोधनामध्ये ज्या लोकांचा सुरुवातीस रक्तदाब आधीच थोडा वाढलेला होता, त्यांच्यामध्ये दारूचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसून आले.

Advertisement

किती प्रमाणात दारू प्यायल्याने किती वाढला बीपी (BP)

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, सामान्य प्रौढांमध्ये हाय ब्लड प्रेशर सहसा 140/90 एमएमएचजी (mmHg) किंवा त्याहून अधिक मानले जाते. संशोधनात असे आढळून आले की, जे लोक दररोज सुमारे 12 ग्रॅम इतक्या प्रमाणात दारू पितात, त्यांच्यामध्ये सिस्टोलिक रक्तदाब सरासरी 1.25 एमएमएचजीने वाढला. दुसरीकडे जे लोक रोज सुमारे 48 ग्रॅम दारू पितात, त्यांच्यामध्ये रक्तदाबात सरासरी 4.9 एमएमएचजीपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले. याशिवाय एवढ्या प्रमाणात दारू पिणाऱ्या पुरुषांमध्ये डायस्टोलिक रक्तदाबातही सुमारे 3.1 एमएमएचजीची वाढ नोंदवली गेली.

काय करावे? तज्ज्ञांचा सल्ला

गिब्लिन यांनी यावरही भर दिला की केवळ दारूच नव्हे तर लाइफस्टाइलमधील अनेक घटक देखील रक्तदाबावर परिणाम करतात. निरोगी आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान सोडणे, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे आणि शरीराचे वजन संतुलित राखणे हे सर्व उपाय हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतात.

(Content Source IANS)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)