Dental Care: दररोज सकाळी आणि रात्री दात घासणे ही आपल्या दिनचर्येतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण तुम्ही तुमचे दात योग्य पद्धतीने घासत आहात का? बहुतेक लोक दात घासताना जी चूक करतात, त्यामुळे दातांचे नुकसान होते. दातांच्या आरोग्यासाठी 'स्क्रब' ब्रशिंग करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे डेंटिस्ट डॉ. भार्गवी यांनी स्पष्ट केले आहे.
दात घासण्याची योग्य पद्धत आणि चुका
दात घासताना आपण कोणत्या प्रकारची मूव्हमेंट करतो, यावर दातांचे आरोग्य अवलंबून असते. दातांना घासण्याची काहीच गरज नाही, तर ते फक्त स्वच्छ करावे लागतात. दात घासताना जी मूव्हमेंट आपण आडवी करतो ती पहिली चुकीची गोष्ट आहे. ही 'स्क्रब' ब्रशिंग दातांसाठी हानिकारक ठरू शकते. ब्रशिंगची योग्य पद्धत 'वर्तुळाकार' किंवा 'उभी' असायला पाहिजे.
पाहा VIDEO
पुढच्या दातांच्या खालच्या बाजूचा मागचा भाग आणि वरच्या दातांच्या बाहेरील बाजू यांसारखे अनेक भाग आपण ब्रशिंग करताना सोडून देतो. वरच्या दातांच्या बाहेरील बाजूस आणि खालच्या दातांच्या आतील बाजूस लाळेचा पहिला थ्रो होत असल्याने तिथे सर्वात जास्त जंतू जमा होतात. त्यामुळे हे भाग व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे आहे. मागचे जे खडबडीत दात किंवा दाढा आहेत, त्यांच्या वरचा भाग देखील घासला गेला पाहिजे.
टूथपेस्टचा वापर किती करावा?
पेस्ट किती वापरायची आणि ब्रश किती वेळा करायचा, यापेक्षा ब्रशिंग टेक्निक कुठले आहे, याला अधिक महत्त्व आहे. टूथपेस्टचा वापर हा जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण ब्रश भरून पेस्ट घेण्याची काहीही गरज नाही. कारण ती सगळी पेस्ट वाया जात असते. तुमचा ब्रश कोणता आहे किंवा तुम्ही किती वेळा ब्रशिंग करता, यापेक्षा तुम्ही कोणत्या टेक्निकने दात स्वच्छ करता, हे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने ब्रशिंग केल्यास दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )