Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करावे आणि काय टाळावे? जाणून घ्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी आणि इतर धातूच्या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तूंची खरेदी केल्याने घरात समृद्धी, सुख-शांती येते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dhanteras 2025: धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या दिवशी आरोग्य आणि समृद्धीचे देवता भगवान धन्वंतरी, धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार, या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांनी समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे पात्र आणले होते. म्हणून या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी आणि इतर धातूच्या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तूंची खरेदी केल्याने घरात समृद्धी, सुख-शांती येते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

धनत्रयोदशी कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ

सोने आणि चांदी : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आर्थिक समृद्धी येते. सोन्याची नाणी, दागिने किंवा मुद्रा खरेदी करणे विशेषतः शुभ मानले जाते. 
भांडी  : पितळ, तांबे किंवा चांदीची भांडी, जसे की ताट, वाटी, दिवा किंवा कलश खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
झाडू :या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. झाडू खरेदी केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. झाडू हे स्वच्छता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

(नक्की वाचा-  Dhanteras 2025: इतके धन मिळेल की ठेवायला जागा पुरणार नाही, धनत्रयोदशीला 5 उपाय करून पाहाच)

धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू घेणे टाळा

धातूची तीक्ष्ण धार असलेली उपकरणे : धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री किंवा इतर तीक्ष्ण धार असलेली धातूची उपकरणे खरेदी करणे टाळावे.असे मानले जाते की या वस्तू खरेदी केल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते आणि लक्ष्मीचा वास होत नाही.
लोखंडी वस्तू : या दिवशी लोखंडाची खरेदी करणेही अशुभ मानले जाते.
प्लॅस्टिक किंवा काचेच्या वस्तू : या दिवशी काच किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करणे टाळावे. 
काळी वस्तू : काळ्या रंगाच्या वस्तू किंवा काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे या दिवशी अशुभ मानले जाते.

Advertisement

(टीप: लेखात दिलेली माहिती सामान्य धार्मिक श्रद्धा आणि मान्यतेवर आधारित आहे. NDTV मराठीने याची पुष्टी केलेली नाही.)