Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या

Dhanteras 2025: ज्योतिषी आणि मानसशास्त्रज्ञ विशाल तर्टे यांनी धनत्रयोदशी सणाशी संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी?
Canva

Dhanteras 2025: आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशी (Dhanteras 2025) म्हणजेच देवतांचे वैद्य 'धन्वंतरी देवता' यांची जयंती. देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनातून धन्वंतरी यांचा जन्म झाला. चार हात असलेल्या भगवान धन्वंतरी यांच्या एका हातामध्ये अमृत कलश, दुसऱ्या हातामध्ये जळू, तिसऱ्या हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये चक्र आहे. यंदा 18 ऑक्टोबर (शनिवारी) 2025 रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी नेमकी कशा पद्धतीने पूजा करावी, शुभ मुहूर्त काय आहे आणि कोणत्या मंत्रांचा जप करावा? याबाबत ज्योतिषी आणि मानसशास्त्रज्ञ विशाल तर्टे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...

धनत्रयोदशीला कोणकोणत्या देवतांची पूजा करावी?

ज्योतिषी आणि मानसशास्त्रज्ञ विशाल तर्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, श्री गणेश आणि कुबेर देवता यांची पूजा करण्याची परंपरा आहे.

  • धनत्रयोदशीची तारीख: 18 ऑक्टोबर 2025
  • धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त: संध्याकाळी 5.57 वाजेनंतर पूजा करावी

धनत्रयोदशी दिवशी पूजन कसे करावे?

ज्योतिषी विशाल तर्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. नवीन भांड्यामध्ये धणे भरुन त्याचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशी दिवशी पिठामध्ये हळद मिक्स करुन दिवा तयार केला जातो आणि हा दिवा घराबाहेर प्रज्वलित करावा, दिव्याचे टोक दक्षिण दिशेला ठेवण्यास सांगितले जाते. असे केल्यास यमाची कृपा होते, असे मानले जाते. 

Advertisement

(नक्की वाचा: Lakshmi Puja 2025 Date And Time: लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती? 20 की 21 ऑक्टोबर? शुभ मुहूर्तही जाणून घ्या)

कोणत्या मंत्राचा जप करावा? 

धनत्रयोदशीला कुबेर देवता आणि लक्ष्मीमातेची कृपा मिळवण्यासाठी "ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥" या मंत्राचा जप करू शकता. याशिवाय धनप्राप्तीसाठी कुबेर चालिसाचे पठण करू शकता किंवा धनत्रयोदशीसाठी खास असलेले कुबेर स्तोत्र देखील म्हणू शकता, जे लक्ष्मीमाता आणि कुबेर देवतेची कृपा मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते, अशी माहिती ज्योतिषींनी दिली. 

यमदीपदानाचे महत्त्व काय आहे?

अकाली मृत्यू कोणालाही येऊ नये, यासाठी धनत्रयोदशीला संध्याकाळच्या वेळेस कणकेचे तेलाचे 13 दिवे प्रज्वलित करुन दिव्यांचे तोंड घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवावे, असे म्हणतात. 

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)