Dhanteras 2025 Upay: आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा 18 ऑक्टोबर 2025 (शनिवारी) धनत्रयोदशी आहे. मान्यतेनुसार धनत्रयोदशीला समृद्धीची देवी महालक्ष्मी (Goddess Lakshmi), धनाची देवता कुबेर (Lord Kubera) आणि आरोग्याची देवता धन्वंतरी (Lord Dhanvantari) यांचे पूजन केले जाते. धनत्रयोदशीला खरेदी किंवा गुंतवणूक केलेल्या गोष्टींमध्ये 13 पट वाढ होते, असे म्हणतात. शुभ फळ आणि भाग्य उजळण्यासाठी या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करावी आणि काय खरेदी करू नये? याबाबत प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ डॉ. नीती एस. शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
धनत्रयोदशीला काय खरेदी करावे? | What To Buy On Dhanteras 2025
- सोने, चांदी, भांडी, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, जमीन, शेअर्स किंवा इत्यादी गुंतवणूक.
- पंचधातू किंवा तांब्याचे पात्र, लक्ष्मी-गणेश मूर्ती, दीपक, शंख आणि श्री यंत्र.
- धन्वंतरी पूजनासाठी तांब्याचा कलश आणि तुळशीची पाने.
धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये? | What Not Buy On Dhanteras 2025
- लोखंड, स्टील किंवा अॅल्युमिनिअमची भांडी.
- काळ्या रंगाचे कपडे, काळ्या रंगाचे फुटवेअर.
- नुकसान झालेल्या मूर्ती, जुन्या वस्तू, फाटलेले कपडे.
- उधारीवर वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.
धनत्रयोदशीचे महाउपाय | Dhanteras 2025 Mahaupay
- धनत्रयोदशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा प्रज्वलित करावा, हा उपाय केल्यास आरोग्य आणि संपत्तीमध्येही वाढ होते.
- धनत्रयोदशीला तिजोरीमध्ये गोमती चक्र ठेवा, यामुळे संपत्ती स्थिर राहण्याचा योग निर्माण होईल.
- धनत्रयोदशीच्या दिवशी श्री यंत्राची विधीवत पूजा करावी, हा उपाय केल्यास संपत्तीचा प्रवाह आणि घरात लक्ष्मीची स्थिरता वाढते.
- धनत्रयोदशीला यम दीपदान नक्की करा, हा उपाय केल्यास अकाली येणाऱ्या मृत्यूची भीती आणि रोग-दोषांपासून मुक्तता मिळते.
- धनत्रयोदशीच्या दिवशी श्री सूक्त आणि कुबेर स्त्रोताचे पठण नक्की करा. हिंदू मान्यतेनुसार हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर राहण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार गुंतवणूक करा, भाग्य उजळेल आणि पैशांचा होईल वर्षाव)
धनत्रयोदशीचे धार्मिक महत्त्व | Dhanteras 2025 Significance
धनत्रयोदशीच्या दिवशी जो व्यक्ती सकारात्मक भावना आणि शुभ संकल्पासह एखादी गोष्ट खरेदी करतो, त्यास वर्षभर आर्थिक स्थिरता प्राप्त होते, असे म्हणतात.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये म्हटलं गेलंय की, 'धनत्रयोदशीं नित्यं लक्ष्म्याय नमः स्मरेत्. धनवन्तं भवेन्नित्यं आरोग्यं च लभेत्सदा'
म्हणजे जी व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीमाता, कुबेर देवता आणि धन्वंतरीचे पूजन करतात, ती मंडळी कायम श्रीमंत, निरोगी आणि भाग्यवान राहतात. पंचांगानुसार यंदा धनत्रयोदशीला गुरू ग्रह कर्क राशीत उच्चस्थानी राहील, ज्यामुळे "हंसपंचपुरुष महायोग" आणि "लाभयोग" जुळून आले आहेत. म्हणून शुभ फळ प्राप्त करण्यासाठी शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी देवी, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांचे पूजन नक्की करा.
(नक्की वाचा: Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)