Dhanteras 2025: धनाची देवी लक्ष्मीमातेची कृपा मिळवण्यासाठी लोक धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तांची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर विधीवत पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते, असे म्हणतात. तसेच या दिवशी धनाची पूजा करण्याचे तसेच गुंतवणूक करण्याचे विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीला लोक स्वतःच्या क्षमतेनुसार काही-न्-काही गोष्टी खरेदी करतात किंवा एखाद्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. यंदा 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी आहे, या दिवशी राशीनुसार गुंतवणूक केल्यास संपूर्ण वर्षभर आर्थिक स्थिती मजबूत होण्यास आणि सुख-समृद्धीचा वर्षाव होण्यास मदत मिळते, असे म्हणतात. प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ डॉ. नीती एस. शर्मा राशीनुसार सांगितलेली गुंतवणुकीबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...
धनत्रयोदशी 2025 राशीनुसार कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी?
1. मेष रास (Aries)
- मेष राशीकरिता धनत्रयोदशी म्हणजे नवी गुंतवणूक आणि धाडसी निर्णय घेण्याचा काळ आहे.
- शेअर बाजार, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.
- वास्तू टीप: पैशाचा प्रवाह स्थिर राहण्यासाठी दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा.
2. वृषभ रास (Taurus)
- शुक्र ग्रह स्वामी असल्याने एखादी मौल्यवान गोष्ट, दागिने आणि ब्युटी प्रोडक्ट्समध्ये गुंतवणूक करणे शुभ राहील.
- सोने किंवा चांदी खरेदी करणे उत्तम ठरेल.
- धनसंपत्ती वाढवण्याचा मंत्र: "ॐ श्रीं ह्रीं श्रीं नमः लक्ष्म्यै नमः"
3. मिथुन रास (Gemini)
- बुध ग्रहाच्या प्रभावाअंतर्गत कम्युनिकेशन, मीडिया, शिक्षण आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करावी.
- शेअर बाजारातील आयटी आणि टेलिकॉम सेक्टरमुळे लाभ मिळू शकतो.
- उपाय : हिरव्या रंगाच्या वस्त्रामध्ये खडीसाखर आणि तुळशीची पाने बांधून तिजोरीमध्ये ठेवा.
4. कर्क रास (Cancer)
- बँकिंग, वित्त आणि विम्यामधील गुंतवणूक फलदायी ठरेल.
- सोन्याची नाणी किंवा पिवळ्या रंगाचा धातू खरेदी करा.
- उपाय: घराच्या पूर्वे दिशेला केशरयुक्त दिवा प्रज्वलित करावा.
5. सिंह रास(Leo)
- सिंह राशीकरिता रिअल इस्टेट, सिनेमा, ग्लॅमर आणि सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
- सूर्यतत्त्वाशी संबंधित वस्तू उदाहरणार्थ सोने किंवा तांबे खरेदी करणे शुभ ठरेल.
- उपाय: तिजोरीमध्ये लाल रंगाच्या वस्त्रामध्ये कवड्या ठेवा.
6. कन्या रास(Virgo)
- ट्रेडिंग, फार्मा आणि अॅनालॅटिकल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.
- शेअर बाजारामध्ये काळजीपूर्वक केलेल्या छोट्या गुंतवणुकीमुळे नफा मिळू शकतो.
- उपाय: भगवान धन्वंतरींना तुळशीची पाने अर्पण करा.
7. तूळ रास (Libra)
- मौल्यवान गोष्ट, ज्वेलरी, कॉस्मेटिक आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करणं उत्तम ठरू शकते.
- सोने, चांदी आणि सौंदर्याशी संबंधित वस्तू खरेदी करणे शुभ ठरेल.
- उपाय: गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्त्रामध्ये केशर बांधून तिजोरीमध्ये ठेवा.
8. वृश्चिक रास (Scorpio)
- खाणकाम, तेल, ऊर्जा आणि रसायन क्षेत्रातील शेअर्स तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतील.
- धनत्रयोदशीच्या दिवशी लाल रंगाची वस्तू, रत्ने किंवा तांब्याची नाणी खरेदी करणे शुभ ठरेल.
- उपाय: तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सात दिवे लावा.
(नक्की वाचा: Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या)
9. धनु रास (Sagittarius)
- शिक्षण क्षेत्र, कन्सल्टन्सी, पर्यटन आणि धार्मिक संस्थांमध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल.
- पिवळ्या रंगाचे धातू किंवा पितळेच्या धातूचे पात्र खरेदी करावे.
- उपाय: गुरुवारी चणा डाळ आणि गूळ दान करावे.
10. मकर रास (Capricorn)
- धातू, यंत्रणा, बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करावी.
- काळ्या रंगाचे धातू किंवा स्टील खरेदी करणे टाळा.
- उपाय: तिळाच्या तेलाचा दिवा घराच्या पश्चिम दिशेमध्ये प्रज्वलित करावा.
- तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण गोष्टी, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करा.
- बुद्धिमत्ता आणि व्यवस्थापनामुळे लाभ मिळतील.
- उपाय: शनिवारी शनी यंत्राजवळ निळ्या रंगाची फुलं अर्पण करा.
- फार्मा, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.
- सोन्याची वस्तू किंवा पिवळ्या रंगाचे रत्न खरेदी करा.
- उपाय: दिवाळीपूर्वी लक्ष्मी-नारायणाची एकत्रित पूजा करावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)