Gut Health: पोट स्वच्छ होत नाहीय? त्वचेवरही ग्लो नाहीय? सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' ड्रिंक

Gut Health: धावपळीच्या आयुष्यात त्वचा आणि पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी न्युट्रिशनिस्ट अर्जिता सिंह यांनी सांगितलेले घरगुती पेय आणि त्याचे आरोग्याला होणारे फायदे नक्की जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: पोट स्वच्छ होण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक"
Canva

Gut Health: धकाधकीची जीवनशैली, चुकीचा आहार आणि वाढत्या प्रदूषणामुळे केवळ त्वचेशी संबंधित समस्याच नव्हे तर पोटाच्या आरोग्याचेही नुकसान होते. कारण पोटात गडबड असेल तर चेहरा निस्तेज आणि कोमेजलेला दिसू लागते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल आणि एखादा सोपा उपाय शोधत असाल, तर हा लेख केवळ तुमच्यासाठीच आहे. न्युट्रिशनिस्ट अर्जिता सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पारंपरिक पेयाची (ड्रिंक)माहिती शेअर केली आहे. हे पेय तयार करण्यासाठी तुम्हाला सकाळी-सकाळी मिक्सर वापरण्याची आवश्यकता भासणार नाही. जाणून घेऊया रेसिपी आणि फायदे... 

हे पेय कसे तयार करावे?

हे पेय तयार करण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात सामग्रीची आवश्यकता नाही. केवळ पाच मनुके आणि केशरच्या चार काड्या कपभर पाण्यात भिजवत ठेवा. दुसऱ्या भांड्यात एक चमचा डिंक आणि एक चमचा सब्जाच्या बिया देखील पाण्यात भिजत ठेवा. सकाळपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित भिजतील. सकाळी उठल्यानंतर भिजलेला डिंक, सब्जाच्या बिया, मनुके आणि केशर पाण्यात मिक्स करा. तयार झाले आहे तुमचे पेय. जर तुम्हाला या सर्व गोष्टी एकत्रित मिक्स करायच्या नसतील तर मनुके, केशर चावून खाऊ शकता आणि उरलेले पाणी पिऊ शकता. हे चवीलाही खूप छान लागते.

Advertisement

​आरोग्याला कोणते फायदे मिळतील?

काळे मनुके: भरपूर प्रमाणात लोह (Iron), अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर असते. हे तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी दिवसभर टिकवून ठेवते, पचन सुधारते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते.

केशर: केशरमध्ये क्रोसिन (Crocin) आणि सफ्रानल (Safranal) यासारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे तुमचा मूड चांगला ठेवते, तणाव कमी करते आणि चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करते.

(नक्की वाचा: Rainwater Side Effects: पावसाचे पाणी थेट पिऊ शकतो? 99% लोक करतात मोठी चूक, डॉक्टरांनी सांगितलेले 'हे सत्य ऐकून बसेल धक्का)

Advertisement

सब्जाच्या बिया: सब्जाच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर (Soluble Fiber) भरपूर प्रमाणात असते. हे तुमचे पोट निरोगी ठेवते, वारंवार भूक लागत नाही आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत करू शकते.

डिंक: हा एक नैसर्गिक कुलिंग एजंट आहे, म्हणजेच त्याचा गुणधर्म अतिशय थंड असतो. हे उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवते, हायड्रेटेड (Hydrated) ठेवते आणि पचनक्रिया उत्तम बनवते.
 
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Advertisement

Topics mentioned in this article