जाहिरात

शरीराचा सर्वात घाण भाग कोणता? नाव ऐकून बसेल मोठा धक्का; दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या

Dirtiest Part Of Human Body :  तुम्हाला माहीत आहे का की आपल्या शरीरात एक असा भाग आहे जो वरवर स्वच्छ दिसत असला तरी तिथे प्रचंड प्रमाणात घाण साठलेली असू शकते?

शरीराचा सर्वात घाण भाग कोणता? नाव ऐकून बसेल मोठा धक्का; दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या
Dirtiest Part Of Human Body : या भागाची नियमित स्वच्छता केली नाही, तर..
मुंबई:

Dirtiest Part Of Human Body : आपल्या शरीराला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण दररोज न्हातो. वेगवेगळ्या प्रकारच्या साबण, बॉडी वॉश आणि शॅम्पूचा वापर करून शरीराचा प्रत्येक भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की आपल्या शरीरात एक असा भाग आहे जो वरवर स्वच्छ दिसत असला तरी तिथे प्रचंड प्रमाणात घाण साठलेली असू शकते? धक्कादायक बाब म्हणजे अनेक जण या भागाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे तिथे कोट्यवधी बॅक्टेरिया म्हणजेच जिवाणू तयार होतात.

शरीरातील सर्वात घाण भाग कोणता?

तुम्हाला वाटत असेल की शरीरातील सर्वात घाण भाग म्हणजे नखे, पाय किंवा प्रायव्हेट पार्ट आहेत, तर तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. अनेक संशोधनांनुसार, मानवी शरीरातील नाभी म्हणजेच बेंबी हा सर्वात घाण भागांपैकी एक मानला जातो, जिथे सर्वात जास्त प्रमाणात बॅक्टेरिया आढळतात. 

एका संशोधनातून समोर आले आहे की, माणसाच्या बेंबीमध्ये 2,000 पेक्षा जास्त प्रकारचे बॅक्टेरिया अस्तित्वात असू शकतात. यातील अनेक जिवाणू सामान्य असतात आणि शरीराला कोणतीही इजा पोहोचवत नाहीत, कारण आपल्या त्वचेवर नैसर्गिकरित्या अनेक सूक्ष्मजीव असतात. मात्र, जर या भागाची नियमित स्वच्छता केली नाही, तर तिथे संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो.

( नक्की वाचा : Monsoon Home Care: पावसाळ्यात घराच्या भिंतींना ओल आलीय? खिशातला एकही रुपया खर्च न करता 'अशी' मिळवा सुटका )

बेंबीमध्ये इतके बॅक्टेरिया का साठतात?

बेंबीचा आकार आतल्या बाजूला खोल आणि लहान असल्यामुळे तिथे पसीना, धूळ, तेल आणि मृत त्वचा सहजपणे जमा होते. अनेकदा अंघोळ करतानाही या भागाची खोलवर स्वच्छता होत नाही. तिथे सतत ओलावा किंवा दमटपणा राहत असल्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्यासाठी ही जागा अत्यंत अनुकूल ठरते. 

बेंबीची नियमितपणे योग्य स्वच्छता ठेवली नाही, तर तिथून दुर्गंधी येणे, खाज सुटणे किंवा लालसर पुरळ येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

( नक्की वाचा : Car Insurance Claim : ..तर थेट बँक खात्यात जमा होतील पैसे; कारवर झाड पडल्यास 'हे' काम करायला विसरू नका )
 

बेंबीची योग्य स्वच्छता कशी करावी?

अंघोळ करताना शरीराच्या इतर भागांप्रमाणेच बेंबी देखील हलक्या साबणाने आणि पाण्याने स्वच्छ केली पाहिजे. ज्यांची बेंबी जास्त खोल आहे, त्यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी स्वच्छ कापूस किंवा कॉटन स्वॅब कोमट पाण्यात हलका ओला करून बेंबी हळुवारपणे साफ करावी. 

स्वच्छता केल्यानंतर तो भाग व्यवस्थित सुकवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून तिथे ओलावा राहणार नाही. जर बेंबीमधून सतत दुर्गंधी येत असेल, वेदना किंवा सूज जाणवत असेल, पिवळसर किंवा पांढरा द्राव बाहेर येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com