
Diwali 2025 Padwa Horoscope | Rashi Bhavishya: दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा शुभ मुहूर्त म्हणून महत्त्वाचा दिवस आहे. यंदा 22 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा आहे. दीपावली पाडव्याला चांगल्या कामांचा शुभांरभ केला जातो, कारण हा दिवस फलदायी मानला जातो. दिवाळी पाडव्याच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य कसे आहे, तुमचा दिवस कसा जाईल? जाणून घ्या ज्योतिष्यरत्न प्रीती कुलकर्णी यांनी दिलेली माहिती...
दिवाळी 2025 पाडवा राशीफळ | दीपावली पाडवा 2025 राशीफळ | Diwali 2025 Padwa Horoscope In Marathi
1. मेष रास | Aries Diwali 2025 Horoscope
- आजचा दिवस थोडासा अडचणींचा असेल, अडचणींवर मात करून आनंद मिळवा.
- चिडचिड टाळण्याचा प्रयत्न करावा.
- खरेदी, गुंतवणूक करण्याची संधी आहे.
- सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
- कार्यक्षेत्रात प्रगती होणार, महिलांशी संबंधित क्षेत्राला लाभ मिळणार आहे.
- पती-पत्नीने मतभेद टाळण्याचा प्रयत्न करावा.
- गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्यावी.
उपाय: कुलस्वामिनीची सेवा करणे लाभदायक ठरेल.
2. वृषभ रास | Taurus Diwali 2025 Horoscope
- आजचा दिवस मानसिक ताणतणावाचा असेल.
- दिवसभरात थकवा जाणवण्याची शक्यता आहे.
- नोकरी, कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी निर्माण होऊ शकते.
- कुठलीही गुंतवणूक, ट्रेडिंग त्रासदायक ठरू शकते.
- सासरच्या मंडळींशी किरकोळ वादाची होण्याची शक्यता.
- नात्याला वेळ द्या, संयमाने निर्णय घ्या.
- पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
उपाय: कुलस्वामिनीची आराधना करा.
3. मिथुन रास | Gemini Diwali 2025 Horoscope
- आजचा दिवस चांगला असणार आहे.
- आज पर्यटन, प्रवासाचा योग आहे.
- कुटुंबाला वेळ देण्यासाठी उत्तम काळ आहे.
उपाय: दत्त आराधना लाभदायी ठरेल
4. कर्क रास | Cancer Diwali 2025 Horoscope
- आजचा दिवस धावपळीचा असेल.
- वडिलांची काळजी घ्या, प्रेम द्यावे.
- खाद्यपदार्थ क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस फायेदशीर ठरू शकतो.
- जमीन, धातूशी संबंधित व्यवसायात गुंतवणुकीची संधी निर्माण होऊ शकते.
- यशस्वी वाटचालीसाठी उत्तम दिवस ठरू शकतो.
5. सिंह रास | Leo Diwali 2025 Horoscope
- सिंह राशीकरिता आजचा दिवस संमिश्र असेल.
- संततींकडून आनंद मिळण्याची शक्यता आहे.
- अतिविचार करणे त्रासदायक ठरेल.
- मानसिक आरोग्य जपण्याची गरज आहे.
- मुलांबाबत अधिक चिंता वाटू शकते.
उपाय: दत्त आराधना लाभदायी ठरेल
6. कन्या रास | Virgo Diwali 2025 Horoscope
- आजचा दिवस थोडा खर्चिक असेल.
- घरातील व्यक्तींसाठी खरेदी करण्याची संधी आहे.
- आर्थिक गणित बिघडण्यासाठी शक्यता आहे.
- महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
7. तूळ रास | Libra Diwali 2025 Horoscope
- आजचा दिवस संमिश्र असेल.
- पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. प्रेमाने समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
- जमिनीच्या मुद्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
- जमीन व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे.
- शेअर मार्केट गुंतवणूक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
- सोने खरेदी आणि गुंतवणूक लाभदायी ठरू शकते.
8. वृश्चिक रास | Scorpio Diwali 2025 Horoscope
- वृश्चिक राशीचा आजचा दिवस चांगला असेल.
- आर्थिक प्रगती प्राप्त होऊ शकते.
- प्रकृतीच्या किरकोळ समस्या जाणवतील.
- त्वचा विकार, दाताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
- आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
- सोने, चांदी, कपड्याशी संबंधित व्यापाऱ्यांना आजचा दिवस लाभदायी ठरू शकतो.
- आजचा चांगला आणि यशस्वी दिवस असेल.
- पर्यटन, प्रवासाची संधी मिळेल.
- नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणे लाभदायी ठरेल.
- व्यवसायात आर्थिक उलाढाल होऊ शकते.
- सोनं-चांदी, कपडे, खाद्यपदार्थ क्षेत्रातील लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा: Happy Diwali Padwa 2025 Wishes: नवे पर्व, नवा उत्सव! दिवाळी पाडव्यानिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलयमय शुभेच्छा)
10. मकर रास | Capricorn Diwali 2025 Horoscope- आजचा दिवस थोडासा त्रासदायक असेल.
- मुलांच्या प्रकृतीशी संबंधित समस्या बळावतील.
- विवाह इच्छुक तरुणांना यश मिळू शकते.
- नवीन नोकरी प्राप्त होण्याची शक्यता आहे.
- कुंभ राशीकरिता आजचा दिवस दिलासादायक आहे.
- शांतता बाळगण्याचा प्रयत्न करावा.
- जिद्दी आणि हट्टीपणा टाळावा.
- प्रवासाला जाताना काळजी घ्यावी.
- खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा.
- पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
- नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल.
- मनासारखी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.
- आजचा दिवस सामान्य आहे.
- प्रकृतीबाबत किरकोळ तक्रारी जाणवतील.
- येणाऱ्या काही दिवसात लाभ मिळतील.
- पाठदुखी, मणक्याचा त्रास असणाऱ्यांनी आराम करावा.
- महिलांनी विश्रांती घेण्याची गरज आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world