
Diwali Padwa 2025 Shubh Muhurat And Tithi: कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीला बलिप्रतिपदा तसेच दीपावली पाडवा (Diwali Padwa 2025) साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दीपावली पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी शुभ कार्य देखील केली जातात. व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने पाडव्या दिवशी नववर्षाची सुरुवात होते, याच दिवशी हिशेबाच्या नवीन वह्यांचीही पूजा केली जाते. यंदा दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त कधी आहे? यासह अन्य महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.... (When Is Diwali Padwa 2025)
बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2025) | Balipratipada Kadhi Ahe? | Balipratipada 2025 Date
यंदा बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा 22 ऑक्टोबर रोजी आहे.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा तिथी कालावधी | Kartik Pratipada Tithi Start And End Time | Balipratipada Tithi Start And End Time In Marathi
कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीस (Pratipada Tithi Begins) 21 ऑक्टोबर 2025 रोजी 05:54 वाजता प्रारंभ झाला असून 22 ऑक्टोबर 2025 रोजी (Pratipada Tithi Ends) 08:16 वाजता तिथी समाप्त होणार आहे.
दिवाळी पाडवा 2025 शुभ मुहूर्त | दीपावली पाडवा 2025 | Diwali Padwa 2025 | Deepawali Padwa 2025
- दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 9.30 वाजेपर्यंत आहे.
- दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10.56 वाजेपासून ते दुपारी 12.23 वाजेपर्यंत आहे.
- तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी 4.24 वाजेपासून ते 6.09 वाजेपर्यंत आहे.
- दिवाळी पाडव्याच्या दिवशीही अभ्यंगस्नान केले जाते.
- दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते.
- परंपरेनुसार पती पत्नीला भेटवस्तू देतो.
- नवविवाहित दाम्पत्याची दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते, यास दिवाळसण असे म्हणतात.
बलिप्रतिपदा म्हणजे काय? ऐका हा व्हिडीओ
बलिप्रतिपदेची पौराणिक कथा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा तिथीच्या दिवळी भगवान विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले होते. या दिवशी दीपदान करणाऱ्या व्यक्तीला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वर वामनाने बळीराजाला दिला होता. या दिवशी बलिपूजा करण्याचीही परंपरा आहे. बळीराजा हा असुरांचा अतिशय दानशूर राजा होता. मोठा पराक्रम करून बळीराजाने देवांचा पराभव केला. यानंतर राजाने यज्ञ केला आणि त्यामध्ये अनेक दानही केले. यादरम्यान भगवान विष्णूने वामनावतार धारण करून बळीराजाकडे तीन पावले भूमी मागितली. बळीराजाने हे दान दिल्याबरोबर वामनाने एक पाय स्वर्गावर आणि दुसरा पाय पृथ्वीवर ठेवून दोन्ही गोष्टी व्यापल्या, तिसरे पाऊल कुठे ठेवू? असे विचारताच राजा म्हणाला माझ्या डोक्यावर ठेव. यानंतर वामनाने तिसरे पाऊल डोक्यावर ठेवून त्याला पाताळात गाडले. बळीराजाची निष्ठा आणि उदारपणा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला की दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदा तिथीला लोक तुझी पूजा करतील; तेव्हापासून हा दिवस 'बलिप्रतिपदा' म्हणून साजरा केला जातो.
(नक्की वाचा: Happy Diwali Padwa 2025 Wishes: नवे पर्व, नवा उत्सव! दिवाळी पाडव्यानिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलयमय शुभेच्छा)
गोवर्धन पूजा कधी आहे? Govardhan Puja Date
या दिवशी गोवर्धन पूजाही करण्याची परंपरा आहे.
गोवर्धन पूजेचा मुहूर्त जाणून घेऊया | Govardhan Puja 2025 Shubh Muhuratगोवर्धन पूजेचा दुसरा शुभ मुहूर्त (Govardhan Puja Sayankala Muhurat)
22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 03:51 वाजेपासून ते ते संध्याकाळी 06:11 वाजेपर्यंत आहे.
एकूण कालावधी - 02 तास 19 मिनिटे
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world