Diwali 2025: दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता करताय? राहु-केतुची नकारात्मकता दूर करण्यासाठी 3 टिप्स

Diwali 2025: दिवाळीची साफसफाई करताना घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सोपे उपाय...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Diwali 2025 : घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी 3 सोप्या टिप्स"
Canva

Diwali 2025: दिवाळी सण अगदी काही दिवसांवर आला आहे. आता जिकडेतिकडे सर्वांनी साफसफाईची कामं हाती घेतली असतील. दिवाळी सणानिमित्त घरांसह दुकान, ऑफिसमध्येही साफसफाई केली जाते. तुम्ही देखील घराची स्वच्छता करणार असाल तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. कळत-नकळत आपल्याच चुकांमुळे घरामध्ये राहु-केतुची नकारात्मक ऊर्जा तयार होते. यामुळे तुमच्या आरोग्यावर, कुटुंबीयांवर तसेच घरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींपासून मुक्तता मिळवायची असेल तर ज्योतिषशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी घर स्वच्छ करताना कोणत्या गोष्टी कराव्या, याबाबत सांगितलेले उपाय जाणून घेऊया... 

घरातील राहु-केतुची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी टिप्स | How To Remove Negative Energy Of Rahu Ketu Tips 

1. पहिला उपाय: बंद पडलेली उपकरणे

घराची स्वच्छता करताना बंद पडलेली विद्युत उपकरणे (Electrical Appliances), बंद पडलेले घड्याळ, इस्त्री यासारख्या गोष्टी तुम्ही दुरुस्त करणार असाल तर आताच दुरुस्त करा. या वस्तू दुरुस्त करण्यासारख्या राहिले नसतील तर वेळेच भंगारात काढा. जितके लवकरात लवकर या सर्व वस्तू घराबाहेर काढाल तितके तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कारण या बंद पडलेल्या गोष्टींमध्ये राहुची ऊर्जा असते. 

2. दुसरा उपाय: गळणारे नळ दुरुस्त करा

घरामध्ये गळणारे नळ असतील, घरातील एखाद्या भिंतीला भेगा गेल्या असतील, कुठेतरी गळती सुरू असेल तर शक्य असल्यास या गोष्टी वेळीच दुरुस्त करा. कारण यामध्ये केतुची ऊर्जा असते. 

3. तिसरे उपाय : जुने फुटवेअर 

तमच्या घरामध्ये वापरात नसलेल्या जुन्या चप्पल, बूट एकूणच फुटवेअर असतील तर त्या देखील घराबाहेर काढा. भंगारात फेका किंवा कचऱ्याच्या डब्यात फेका.  

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)