मानसी पिंगळे, प्रतिनिधी
Bank Holidays On Diwali: दिवाळी आणि ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. 29 ऑक्टोबर 2024 रोजी धनत्रयोदशी आहे. दिवाळीला सुरुवात 31 ऑक्टोबर रोजी होत आहे. दिवाळीचा पहिला दिवस 31 ऑक्टोबर (गुरुवार) आणि 1 नोव्हेंबर (शुक्रवार) याबाबत अनेकांना संभ्रम आहे. त्यामुळे बँकांच्या सुट्यांबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
29 ला धनत्रयोदशी तर, 31 तारखेला नरक चतुर्दशी आहे. पण या दोन्ही दिवस बँका सुरु असतील. राज्यातील बँका 1 आणि 2 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी, शनिवारी बंद राहणार असून, 3 तारखेला रविवार असल्याने सलग तीन दिवस बंद असणार आहेत. 1 आणि 2 नोव्हेंबरला महाराष्ट्रात बँकांना दिवाळीची सुट्टी आणि 3 तारखेला रविवार आहे. याचाच अर्थ 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर राज्यातील बँका बंद असतील.
( नक्की वाचा : Car Offers : दिवाळीत कार खरेदीची सुवर्णसंधी; 'या' कंपन्यांच्या कारवर लाखोंची सूट )
बँका बंद असतील तर कशी करणार कामं?
देशभरातील सर्व राज्यांमध्ये दिवाळी सुट्टीचं वेळापत्रक वेगळं आहे. त्यामुळे बँकाचे व्यवहार कसे करायचे हा तुमच्या मनात प्रश्न असेल, तर घाबरण्याची गरज नाही. बँकेच्या शाखा बंद राहतील, परंतु बँकेच्या डिजिटल सेवा सुरूच राहतील, त्यामुळे बँकिंग काम ऑनलाइन करू शकता. बँकेची वेबसाइट किंवा मोबाईल ॲप वापरून पैसे ट्रान्सफर करता येतील. कोणत्याही बँकेच्या ATM चा वापर करू करता येईल. त्याचबरोबर काही अडचण असेल तर, बँकेच्या कस्टमर केअरशीसुद्धा संपर्क तुम्ही करु शकता.