जाहिरात

Car Offers : दिवाळीत कार खरेदीची सुवर्णसंधी; 'या' कंपन्यांच्या कारवर लाखोंची सूट

Diwali Discount & Offers on Cars 2024 : तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर, कार कंपन्या आणि डीलर्स स्टॉक साफ करण्यासाठी आणखी सूट देऊ शकतात. या काळात, आणखी अनेक मॉडेल्सवर प्रचंड सूट मिळू शकते. म्हणूनच, जर तुम्ही स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दिवाळीनंतरही संधी आहे. 

Car Offers : दिवाळीत कार खरेदीची सुवर्णसंधी; 'या' कंपन्यांच्या कारवर लाखोंची सूट
Best Diwali Discount Offers on Cars

दिवाळीत अनेकजण कार खरेदी करतात. मात्र तुम्ही देखील यंदाच्या दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अनेक ऑफर्स तुमच्यासाठी आहेत. या दिवाळीत तुम्ही कार खरेदी करुन लाखो रुपयांची बचत करु शकता. मारुती सुझुकी, होंडा, एमजी, महिंद्रा, टाटा मोटर्स,ऑडी, मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्ल्यू सारख्या मोठ्या ब्रँड्सकडून कार खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

एवढी सूट का मिळत आहे?

कोविड-19 नंतरच्या तेजीनंतर, कार मार्केट आता मंदीतून जात आहे. त्यामुळे वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कंपन्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. कंपन्यांना त्यांचे जुने मॉडेल लवकर विकून नवीन वाहनांसाठी जागा तयार करायची आहे.

कोणत्या गाड्यांवर अंदाजे किती सूट मिळत आहे?

मारुती बलेनो (1.1 लाख रुपये), मारुती ग्रँड विटारा (1.1-1.4 लाख रुपये), महिंद्रा स्कॉर्पिओ जुने मॉडेल (1.2 लाख रुपये), टोयोटा फॉर्च्युनर (2 लाख रुपये), जीप कंपास (2.5 लाख रुपये), एमजी ग्लोस्टर (4.9 लाख रुपये) एवढी सूट मिळत आहे. 

अनेक लक्झरी कारवरही मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. Audi Q8 e-tron, Kia EV6, BMW X5 (7-10 लाख रुपये), Mercedes-Benz S-Class (9 लाख रुपये) एवढी सूट उपलब्ध आहे. याशिवाय सुझुकी जिमनी, महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक (3 लाख रुपये) आणि महिंद्रा थार (1.5 लाख रुपये) यांसारख्या भारतीय कार्सवरही सूट उपलब्ध आहे.

दिवाळीनंतर आणखी सूट मिळेल का?

या सवलती मर्यादित कालावधीसाठी आहेत. त्यामुळे या ऑफर काही दिवसांनी उपलब्ध असतील की नाही सांगता येत नाही. तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर, कार कंपन्या आणि डीलर्स स्टॉक साफ करण्यासाठी आणखी सूट देऊ शकतात. या काळात, आणखी अनेक मॉडेल्सवर प्रचंड सूट मिळू शकते. म्हणूनच, जर तुम्ही स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दिवाळीनंतरही संधी आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com