Summer Food : मे महिन्यात चुकूनही 'या' 3 भाज्या खाऊ नका; उन्हाळ्यात कोणत्या भाज्या टाळाल, काय खायला हवं?

उन्हाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्यातही मे महिन्यात उकाडा जास्त असतो.  त्यामुळे या काळात डिहायड्रेशनचा धोका असतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

Summer Food : उन्हाळ्यात केवळ पाणी पिणं पुरेसं नसतं. तुम्ही काय खाता हे देखील तितकच महत्त्वाचं असतं. अशा अनेक भाज्या आहेत ज्या या काळात खाणं शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतं. तर काही भाज्या शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करू शकतात. 

उन्हाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्यातही मे महिन्यात उकाडा जास्त असतो.  त्यामुळे या काळात डिहायड्रेशनचा धोका असतो. त्यामुळे जर योग्य पदार्थांची निवड केली नाही तर इनडायजेशन आणि डायरियासारखा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांनुसार, काही भाज्या शरीरातील उष्णता वाढवतात, ज्यामुळे सुस्ती येणे किंवा डिहायड्रेशन होऊ शकतं. यासाठी हलक्या आणि पाणीयुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खायला हव्यात आणि कोणत्या भाज्या खाणं टाळाल. 

Advertisement

उन्हाळ्यात या भाज्या खाणं टाळा...(Which vegetables should you avoid during the summer?)

१ मुळ्यासारख्या जड कंदमूळं. या पचायला जास्त वेळ घेतात.
२ काही पालेभाज्या उदाहरणार्थ सरसोची पानं, ही भाजी हिवाळ्यासाठी फायदेशीर असते. 
३ फणस, आलं आणि लसूण यामुळे पोटात गॅस आणि शरीर जड होतं. 

या भाज्या खाणं ठरू शकतं त्रासदायक...

पचायला जड असणारे पदार्थ खाल्ल्याने चयापचयाची क्रिया मंदावते. पचायला जड असलेले पदार्थ खाल्ल्याने थकवा किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात काही भाज्या खाल्ल्याने अॅसिडिटी किंवा त्वचेशी संबंधित त्रास होऊ शकतो. 

कोणत्या भाज्या खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

  • दुधी भोपळा, दोडका आणि भोपळा
  • काकड्या आणि जास्त पाणी असलेल्या इतर भाज्या.
  • पालकासारख्या हलक्या शिजवलेल्या पालेभाज्या.
  • हिरव्या मुगासारखी सहज पचणारी मोड आलेली कडधान्ये.
या भाज्यांमुळे नैसर्गिकपणे थंडावा मिळतो. सहजपणे पचतात आणि घामाच्या माध्यमातून शरीरातून निघालेले इलेक्ट्रोलाइट्स भरून निघण्यास मदत करतात. 

उन्हाळ्यासाठी सोप्या डाएट टिप्स...

१ एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी थोडं-थोडं अन्न थोड्या थोड्या अंतराने खा. 
२ विटॅमिन सी आणि आर्यन चांगल्या पद्धतीने शोषूण घेण्यासाठी जेवणात लिंबाचा वापर करा.
३ शरीरात उष्णता वाढविण्याऱ्या भाज्या टाळा आणि थंडावा वाढविणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article