जाहिरात

​'Bank'ला हिंदीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही याचं उत्तर, जाणून घ्या काय आहे तो शब्द

रेल्वे स्टेशन, कॉम्प्युटर, मोबाईल प्रमाणेच बँकेनेही इंग्रजी रूपातच आपल्या भाषेत स्थान मिळवले आहे.

​'Bank'ला हिंदीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही याचं उत्तर, जाणून घ्या काय आहे तो शब्द

What is bank called in hindi: नोकरी करणारा पगारदार असो, गृहिणी असो वा व्यावसायिक, 'बँक' हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पैशांची बचत, ऑनलाईन व्यवहार किंवा कर्ज घेणे यासाठी आपण सतत बँकेची पायरी चढतो. परंतु, रोजच्या वापरातील या 'Bank' शब्दाला शुद्ध हिंदीत काय म्हणतात, हे 99 टक्के लोकांना ठाऊक नाही. सामान्यतः आपण हिंदीतही याला बँकच म्हणतो, पण हिंदी शब्दकोशानुसार याचा एक अधिकृत शब्द आहे. जो स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

नक्की वाचा - चवीला भारी, आरोग्याला लय भारी! उन्हाळ्यात अननस खाण्याचे 'हे' मोठे फायदे वाचून थक्क व्हाल

​हिंदी शब्दकोशानुसार, बँकेला हिंदीमध्ये 'अधिकोष' (Adhikosh) असे म्हटले जाते. हा शब्द मूळ संस्कृतमधून आला आहे. 'अधिकोष' याचा सोपा अर्थ असा होतो – अशी जागा जिथे पैसा सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचे पद्धतशीर व्यवस्थापन केले जाते. ​बँकेचे मुख्य काम लोकांचे पैसे सुरक्षित ठेवणे, ठेवी स्वीकारणे आणि गरजू लोकांना कर्ज (Loan) उपलब्ध करून देणे हे आहे. बदलत्या काळात 'अधिकोष' हा शब्द जनमानसातून पूर्णपणे गायब झाला. कॉम्प्युटरला 'संगणक' किंवा मोबाईलला 'भ्रमणध्वनी' जसे लोक म्हणत नाहीत, तसेच बँकेच्या बाबतीतही झाले आहे. 

नक्की वाचा - Jamun Benefits: उन्हाळ्यात मिळणारे 'हे' फळ मानले जाते डायबिटीजचा सर्वात मोठा शत्रू! कसे, कधी आणि किती खावे?

याशिवाय फिक्स डिपॉझिट, विमा आणि डिजिटल पेमेंट अशा अनेक सेवा बँक देते. व्यावहारिक भाषेत 'अधिकोष' हा शब्द कधीच वापरला जात नसल्याने लोकांना तो ठाऊक नसतो. रेल्वे स्टेशन, कॉम्प्युटर, मोबाईल प्रमाणेच बँकेनेही इंग्रजी रूपातच आपल्या भाषेत स्थान मिळवले आहे. ​सध्या सोशल मीडिया आणि जनरल नॉलेजच्या वर्तुळात एक प्रश्न खूप चर्चिला जात आहे, तो म्हणजे आपण रोज ज्या बँकेत जातो, त्याला हिंदीत काय म्हणतात? ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला आता बँकेला हिंदीत काय म्हणतात हे समजले असेल. 
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com