- हिंदी शब्दकोशानुसार बँक या शब्दासाठी अधिकोष हा अधिकृत हिंदी शब्द वापरला जातो
- अधिकोष हा शब्द संस्कृतमधून आला असून त्याचा अर्थ पैसा सुरक्षित ठेवण्याची जागा असा आहे
- बँक लोकांचे पैसे सुरक्षित ठेवते, ठेवी स्वीकारते आणि गरजू लोकांना कर्ज उपलब्ध करून देते
What is bank called in hindi: नोकरी करणारा पगारदार असो, गृहिणी असो वा व्यावसायिक, 'बँक' हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पैशांची बचत, ऑनलाईन व्यवहार किंवा कर्ज घेणे यासाठी आपण सतत बँकेची पायरी चढतो. परंतु, रोजच्या वापरातील या 'Bank' शब्दाला शुद्ध हिंदीत काय म्हणतात, हे 99 टक्के लोकांना ठाऊक नाही. सामान्यतः आपण हिंदीतही याला बँकच म्हणतो, पण हिंदी शब्दकोशानुसार याचा एक अधिकृत शब्द आहे. जो स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
हिंदी शब्दकोशानुसार, बँकेला हिंदीमध्ये 'अधिकोष' (Adhikosh) असे म्हटले जाते. हा शब्द मूळ संस्कृतमधून आला आहे. 'अधिकोष' याचा सोपा अर्थ असा होतो – अशी जागा जिथे पैसा सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचे पद्धतशीर व्यवस्थापन केले जाते. बँकेचे मुख्य काम लोकांचे पैसे सुरक्षित ठेवणे, ठेवी स्वीकारणे आणि गरजू लोकांना कर्ज (Loan) उपलब्ध करून देणे हे आहे. बदलत्या काळात 'अधिकोष' हा शब्द जनमानसातून पूर्णपणे गायब झाला. कॉम्प्युटरला 'संगणक' किंवा मोबाईलला 'भ्रमणध्वनी' जसे लोक म्हणत नाहीत, तसेच बँकेच्या बाबतीतही झाले आहे.
याशिवाय फिक्स डिपॉझिट, विमा आणि डिजिटल पेमेंट अशा अनेक सेवा बँक देते. व्यावहारिक भाषेत 'अधिकोष' हा शब्द कधीच वापरला जात नसल्याने लोकांना तो ठाऊक नसतो. रेल्वे स्टेशन, कॉम्प्युटर, मोबाईल प्रमाणेच बँकेनेही इंग्रजी रूपातच आपल्या भाषेत स्थान मिळवले आहे. सध्या सोशल मीडिया आणि जनरल नॉलेजच्या वर्तुळात एक प्रश्न खूप चर्चिला जात आहे, तो म्हणजे आपण रोज ज्या बँकेत जातो, त्याला हिंदीत काय म्हणतात? ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला आता बँकेला हिंदीत काय म्हणतात हे समजले असेल.