दररोज 10 हजार पावलं चालल्याने काय होतं? वयानुसार रोज किती स्टेप्स चालायला हवीत

सर्वसाधारणपणे जर एखादी व्यक्ती दीड ते दोन किलोमीटर अंतर चालत पार करीत असेल तर साधारण 3 ते 4 हजार पाऊलं होतात.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

फिटनेससाठी नियमित चालण्याचा व्यायाम प्रत्येकाने आपल्या रुटिनमध्ये सामील करण्याचा सल्ला दिला जातो. सर्वसाधारणपणे जर एखादी व्यक्ती दीड ते दोन किलोमीटर अंतर चालत पार करीत असेल तर साधारण 3 ते 4 हजार पाऊलं होतात. इतकं चालूनही तुम्ही कोणत्याही आजारापासून स्वत:चा बचाव करू शकता. जर तुम्ही याच्या अर्ध्याहून थोडं जास्तही चालू शकला तर हृदयाच्या आजारांमुळे उद्भवणारी मृत्यूची भीती कमी करू शकता. याबाबत युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव कार्डियोलॉजीमध्ये एक जर्नल प्रकाशित झालं आहे. जर तुम्ही दररोज दहा हजार पाऊलं चालण्याचं ध्येय समोर ठेवत असाल तर तुमच्या शरीरात काय परिणाम होऊ शकतो? 

एका दिवसात किती चालायला हवं?
दररोज दहा हजार पाऊल चालणं फायदेशीर असतं. विशेष म्हणजे दिवसाला 10,000 पावलं चालण्याचे उद्दिष्ट कोणत्याही वैज्ञानिक शोधातून नाही तर मार्केटिंगच्या अभियानातून पुढे आलं आहे. भरपूर चालण्याचे निश्चितच फायदे आहेत. परंतु दिवसाला 10,000 पावलं चालणे ही काही जादूची कांडी नाही. अनेकांना 4,000 पावलं देखील फायदेशीर ठरू शकतात.

वयानुसार किती चालायला हवं?
वय, फिटनेस आणि आरोग्य सारख्या गोष्टी लक्षात ठेवून दररोज चालण्याचं लक्ष्य ठरवायला हवं. वय वाढतं तसं शरीराची कार्यक्षमता कमी होत जते. त्यामुळे आपल्याला आधीच्या तुलनेत जास्त एनर्जी खर्च करावी लागते. तरुणवयात दररोज आठ हजार ते दहा हजार पाऊलं चालणं शरीरासाठी चांगलं असतं, तर यानंतर सहा ते आठ हजार पाऊलं चालणं पुरेसं आहे. 

नक्की वाचा - रात्रीच्या जेवणातील या चुका ठरू शकतात तुमचं वजन वाढण्याचं कारणं...

स्वत:ला हळू हळू पूश करा...
पहिल्याच टप्प्यात मोठं लक्ष्य ठेवू नका, सुरुवात एक हजार पाऊलांपासून करा. यानंतर हळूहळू आपलं लक्ष्य वाढवा. ज्यामुळे तुमच्या शरीराला नव्या रुटीनची सवय लागण्यास मदत होईल. 

चालणं हा सर्वाधिक फायदा देणारा व्यायाम आहे. यासाठी काही खास उपकरणांची गरज नसते. यासाठी तुम्हाला एक जोडी चांगल्या शूजची गरज असते. पायी चालणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. नियमित चालण्याच्या व्यायमामुळे हृदयविकार, स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब याशिवाय नैराश्यासारख्या गंभीर आजारांचा सामना करू शकता. 

मूड आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम...
अनेक अभ्यासानुसार, दररोज दहा हजार पाऊलं चालल्याने तुमचा मूड आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होण्याबरोबरच वजन कमी होण्यास मदत होते. जलद गतीने चालल्यामुळे तुमच्या फुप्फुसांच्या क्षमतेत वाढ होते. हृदयाचं आरोग्य सुधारतं. नियमित चालल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होता. यामुळे रोग प्रतिकारक क्षमतेत वाढ होते आणि चांगली झोप येते.