Egg Side Effects : अंड्यांवरुन सध्या सोशल मीडियावर घमासान सुरू आहे. याबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांनी मोठा खुलासा केला आहे. देशातील अंडी खाण्यास अत्यंत सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. प्राधिकरणाने सांगितलं की, अशा चर्चांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
नायट्रोफ्युरान काय आहे ?
नायट्रोफ्युरान अँटीबायोटिक्सचा एक समूह आहे. याचा उपयोग खाल्ल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये केला जात नाही. आरोग्य तज्ज्ञांनुसार, जर पोल्ट्री फार्मिंगमध्ये या औषधांचा बेकायदेशीरपणे वापर केला तर हे धोकादायक घटना अंड्यांपर्यंत पोहोचू शकतात.
ही भीती कशी सुरू झाली?
काही दिवसांपूर्वी काही पोस्टमध्ये अंड्यांमध्ये मेटाबोलाइट्स सारख्या कथित कॅन्सर निर्माण करणारे घटक असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देत FSSAI ने म्हटलं, असे दावा वैज्ञानिक तथ्यांवर आधारित नाहीत.
नायट्रोफ्युरानवर बंदी, तरीही संभ्रम का?
FSSAI नुसार, खाद्य सुरक्षा आणि मानक विनियम, २०११ अंतर्गत पोल्ट्री आणि अंड्याच्या उत्पादनात प्रत्येक टप्प्यात नायट्रोफ्यूरानच्या उपयोगावर पूर्णपणे बंदी आहेत. AOZ साठी १.० मायक्रोग्रॅम प्रति किलोग्रॅमची बाह्य कमाल मर्यादा केवळ नियामक देखरेखीसाठी आहे आणि कोणत्याही स्तरावर पदार्थाच्या वापरास परवानगी देत नाही.
FSSAI हे देखील स्पष्ट केलं की, भारतातील खाद्य सुरक्षेची रचना आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार चालते. युरोपियन युनियन आणि अमेरिकेसारख्या भागातही खाद्य उत्पादन देणाऱ्या प्राण्यांमध्ये नायट्रोफ्यूरानच्या वापरावर बंदी आहे. भारतातही अंड्यामध्ये नायट्रोफ्यूरानचा वापर केला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कॅन्सरचा संबंध नाही...
खाद्य सुरक्षा आणि मानक विनियमयाने वैज्ञानिक अभ्यासाचा हवाला देत सांगितलं, डाएटच्या माध्यमातून नायट्रोफ्यूरान मेटाबोलाइट्सची ट्रेस पातळी संपर्क आणि माणसांमधील कॅन्सर किंवा अन्य गंभीर आजारांमध्ये कोणताही कारणात्मक संबंध स्थापित झालेला नाही. कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्वास्थ संस्थाने सर्वसामान्यपणे अंडाच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढत असल्याचं सिद्ध झालेलं नाही.