 
                                            Diapers Effetcs On Baby Kidneys : लहान बाळ जन्माला आलं की अनेक पालक त्यांच्या मुलाला डायपर घालतात. सुरुवातीच्या महिन्यांमध्ये लहान मुलं अनेकदा लघवी किंवा पॉटी करतात. त्यामुळे पालकांना त्यांच्या बाळाला कपड्याने साफ करावं लागतं. अशावेळी अंडरविअर किंवा कपडे बदलणं सोपं नसतं. अशा परिस्थितीत पालक मुलांसाठी डायपरचा पर्याय निवडतात. परंतु, मुलांना डायपर घालावं की नाही? यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहित होणार आहे. याबाबत पीडियाट्रिशन डॉ. इमरान पटेल यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सविस्तर माहिती सांगितली आहे.
त्या व्हायरल व्हिडीओचं सत्य आलं समोर, डॉक्टर म्हणाले..
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती संभाव्यत: डॉक्टर असल्याचं सांगत आहे. ते एका महिलेला सांगतात की, मुलांना डायपर अजिबात घालू नका. यामुळे किडनी खराब होते. या व्हिडीओला पीडियाट्रिशन डॉ. इमरान पटेल यांनी शेअर करत मोठा खुलासा केला आहे. मुलांना डायपर घालावे की नाही? याबाबत सर्वच पालकांना माहित असलं पाहिजे, असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओत पीडियाट्रिशियन इमरान पटेल यांनी म्हटलंय की, मी एक व्हिडीओ पाहिला, ज्यात म्हटलं होतं की मुलांना डायपर घातल्याने त्यांची किडनी खराब होते. मला याबाबत सांगायचं आहे की, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. अशाप्रकारची सूचना देणे योग्य नाही आणि लोकांमध्ये भीती पसरवणं चुकीचं आहे.
नक्की वाचा >> दोघांनी केला सुशांत सिंह राजपूतचा मर्डर? बहिणीने केला खळबळजनक खुलासा, रिया चक्रवर्तीही निशाण्यावर..
प्रत्येक 2-3 तासांनी लहान मुलांचं डायपर बदलावं
चाईल्ड स्पेशलिस्टने पुढे म्हटलंय, डायपरला प्रत्येक दोन-तीन तासांनी बदललं पाहिजे. याचसोबत मुलांना डायपर-फ्री टाईमही देणं खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा आहे की, दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा डायपरशिवाय मुलांना ठेवणं योग्य असतं. डायपर घातल्याने रॅशेज येऊ शकतात. विशेषत: ज्या मुलांना एलर्जी असते किंवा ज्यांचं डायपर वेळेवर बदललं जात नाही, अशा मुलांना याचा धोका असतो. डॉ. पटेल सांगतात की, डायपरने किडनी खराब होण्याचं कोणतंच लॉजिक नाहीय. किडनी खराब होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण डायपरमुळे किडनी खराब होते, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. पालकांनी याबाबत घाबरू नये.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नक्की वाचा >> CCTV Video पालघरमध्ये खळबळ! ज्वेलर्सवर गोळीबार, बंदूक खाली पडली तरीही सोनं चोरलं, मनी हाईस्टचा खतरनाक प्रकार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
