Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Speech 5: डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त करा प्रभावी भाषण, सर्वजण करतील कौतुक

Dr Ambedkar Jayanti 2026 Speech: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2026 निमित्त शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी 5 प्रभावी भाषणे येथे उपलब्ध आहेत. महामानवाचा संघर्ष, संविधान आणि स्त्री शिक्षण अशा विविध विषयांवरील दमदार भाषणांसाठी हा लेख नक्की वाचा

जाहिरात
Read Time: 5 mins
"Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Speech: डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त करा दमदार भाषण"
ANI

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Speech: कोट्यवधींच्या आयुष्यात स्वाभिमानाची ठिणगी पेटवणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे वैचारिक क्रांतीची पर्वणी आहे. ज्यांनी गुलामगिरीच्या बेड्यात जखडलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याची नवी दिशा दिली, अशा क्रांतीसूर्याचा हा जन्मदिवस संपूर्ण विश्वात मोठ्या गौरवाने साजरा केला जातो. आजच्या या आधुनिक युगातही बाबासाहेबांचे 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हे ब्रीदवाक्य तितकेच प्रेरणादायी ठरते. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक भारतीयाला समानतेचे छत्र दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुमचीही मुलं शाळा, कॉलेज किंवा सोसायटीतील भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होणार असतील तर हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. या लेखाद्वारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी दमदार भाषण तयार करू शकता, वाचा सविस्तर माहिती...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2026| Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Speech Ideas | Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Speech 

1. भाषण 1: महामानवाचा संघर्ष आणि जीवनप्रवास 

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, पूजनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या देशबांधवांनो
हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या ज्यांनी तोडल्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनात ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश पेरला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण जगासाठी ज्ञानाचे प्रतीक होते. 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना जातीयतेचे चटके सोसावे लागले. शाळेत असताना पिण्याचे पाणी असो वा वर्गात बसणे, प्रत्येक ठिकाणी त्यांचा अपमान झाला. पण बाबासाहेबांनी या अपमानाचा बदला शस्त्राने नाही, तर विद्येने घेण्याचे ठरवले. त्यांनी परदेशात जाऊन उच्च पदव्या मिळवल्या. ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नाकारला गेला, त्यांनीच भारताच्या भविष्याची तहान भागवणारे संविधान लिहिले. त्यांनी दिलेला "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र आजही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. आपण केवळ त्यांची जयंती साजरी करू नये, तर त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत.
जय भीम!

Advertisement

2. भाषण 2: भारतीय संविधानाचे शिल्पकार | Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Speeches In Marathi

आदरणीय गुरूजी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो
आज आपण अशा महापुरुषाची जयंती साजरी करत आहोत, ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि आदर्श संविधान आहे.
संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना बाबासाहेबांनी देशातील विविध जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांना एका सूत्रात गुंफले. त्यांनी देशाला लोकशाही दिली. त्यांच्यामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा समान अधिकार मिळाला आहे, मग तो राजा असो वा रंक. बाबासाहेबांचे संविधान केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. त्यांनी संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मूल्यांची पेरणी केली. आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे बाबासाहेबांची अहोरात्र मेहनत आहे. जर आपल्याला बाबासाहेबांना खरी मानवंदना द्यायची असेल, तर संविधानाचे रक्षण करणे आणि त्यातील मूल्यांचे पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

(नक्की वाचा: Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes 25+: महामानवाला अभिवादन! डॉ आंबेडकर जयंती 2026निमित्त पाठवा खास संदेश)

3. भाषण 3: स्त्री शिक्षणासाठी संघर्ष 

उपस्थित सर्व माता आणि भगिनींनो,
अनेकांना वाटते की बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठी कार्य केले, पण हे अर्धसत्य आहे. बाबासाहेबांनी या देशातील महिलांच्या प्रगतीसाठी जे कार्य केले, ते अतुलनीय आहे. बाबासाहेब म्हणायचे,"मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजतो." प्राचीन काळापासून महिलांना शिक्षणापासून आणि मालमत्तेच्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले होते. आज जी महिला डॉक्टर, इंजिनिअर, पायलट किंवा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली आहे, त्यामागे बाबासाहेबांच्या विचारांची ताकद आहे. त्यांनी महिलांना चूल आणि मूल यातून बाहेर काढून सन्मानाने जगायला शिकवले. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया की, स्त्रियांचा सन्मान हाच आपला खरा धर्म असेल.

4. भाषण 4: संघर्ष, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी कहाणी | Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Marathi Speech Ideas 

माझे आदरणीय शिक्षक आणि मित्रवर्गाला नमस्कार
आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे संघर्ष, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन त्यांनी शिक्षणाच्या जोरावर संपूर्ण जगात आपले स्थान निर्माण केले. त्यांनी केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी लढा दिला. त्यांनी समानतेचा संदेश दिला आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. आज आपण त्यांच्यामुळे स्वातंत्र्य, समानता आणि न्याय यांचा अनुभव घेत आहोत. आपण त्यांच्या विचारांचे पालन करून समाजात बदल घडवून आणला पाहिजे. शिक्षण, एकता आणि प्रगती हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. चला, आपणही त्याच मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. 

5. भाषण 5: शिक्षणाचे महत्त्व | Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 News

सर्व मान्यवरांना नमस्कार,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मंत्र दिला. त्यांच्या मते शिक्षण हेच यशाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. गरीब परिस्थितीतून त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि अनेक पदव्या मिळवल्या. त्यांचा विश्वास होता की शिक्षणामुळेच समाजात बदल घडू शकतो. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून कठोर परिश्रम केले पाहिजेत. जर आपण बाबासाहेबांच्या मार्गावर चाललो, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ.
डॉ. आंबेडकर यांनी समाजात समानतेसाठी मोठा संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज समाजात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. तरीही अजूनही काही ठिकाणी भेदभाव दिसून येतो. आपण सर्वांनी मिळून समतेचा संदेश पसरवला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला समान मान दिला पाहिजे, धन्यवाद.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)