जाहिरात

Methi Water Benefits: सलग 21 दिवस सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथीचे पाणी, शरीरात वेगाने घडतील हे थक्क करणारे बदल

Methi Water Benefits: सलग 21 दिवस सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्यास ब्लड शुगर, खराब कोलेस्टेरॉल, वजन आणि पचनाच्या समस्यांवर कसा फायदा होतो? डॉ. सलीम झैदी यांनी सांगितलेला सोपा उपाय जाणून घ्या.

Methi Water Benefits: सलग 21 दिवस सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथीचे पाणी, शरीरात वेगाने घडतील हे थक्क करणारे बदल
"Methi Water Benefits: रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिण्याचे फायदे"
Canva

Methi Water Benefits: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तुमच्या खाण्यापिण्याच्या वाईट सवयी अनेक आजारांचे कारण ठरत आहेत. ब्लड शुगर वाढणे, कोलेस्टेरॉलची पातळी असंतुलित होणे, पोटात गॅस होणे आणि वजन वाढणे या आता सामान्य समस्या बनल्या आहेत. यातून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक औषधे आणि महागडे सप्लिमेंट्स घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या किचनमध्ये ठेवलेली एक छोटीशी गोष्ट या सर्व समस्यांपासून सुटका मिळवून देऊ शकते? होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे.

आपण मेथीच्या दाण्यांबाबतच (Methi Seeds) बोलत आहोत. हेल्थ एक्सपर्ट डॉक्टर सलीम झैदी यांनी मेथीचे पाण्याचा डाएटमध्ये वापर करण्याचा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. जर तुम्ही सलग 21 दिवस सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायलात तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

(नक्की वाचा: तुमची मांडी सांगणार तुम्ही किती वर्ष जगणार? डॉ. सेठींनी 12 वर्षांच्या रीसर्चमधील सांगितला मोठा खुलासा)

मेथीचे पाणी कसे प्यावे? 

मेथीच्या दाण्यांचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने पिणे गरजेचे आहे. डॉक्टर सलीम झैदी यांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वात आधी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. पाणी प्यायल्यानंतर खाली उरलेले मेथीचे दाणे फेकून न देता ते नीट चावून खा.

(नक्की वाचा: Fitness Tips: मी रोज वॉक करते, तरीही शरीराने फिट का नाही? फिटनेस कोचने सांगितलं खरं कारण)

ऐका व्हिडीओ

21 दिवसांत शरीराला मिळतील हे फायदे

  1. ब्लड शुगर आणि मधुमेह: मेथी दाणे इन्सुलिनचा प्रभाव वाढवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे नैसर्गिक औषधासारखे काम करते आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते.
  2. खराब कोलेस्टेरॉल: नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका खूप कमी होतो.
  3. ब्लोटिंग आणि पचन: जर तुम्हाला पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठते यासारख्या समस्या असतील तर मेथीचे पाणी तुमची पचनसंस्था अगदी उत्तम ठेवू शकते.
  4. वेटलॉस: मेथी दाण्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, हे दाणे चावून खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन वेगाने कमी होऊ शकते.
  5. डिटॉक्स: सकाळी सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व टॉक्सिन्स (विषारी घटक) बाहेर पडतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेवरही नॅचरल ग्लो (नैसर्गिक चमक) येऊ शकतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com