Healthy Tips: चहाने दिवसाची सुरुवात करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र अशी अनेकजणं आहेत ज्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने आणि सायंकाळदेखील चहाने पूर्ण होते. चहा हा काही हेल्दी पेयांपैकी नाही, मात्र चहासंबंधित काही चुका जर टाळल्या नाही तर चहा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. चहासंबंधित अशाच काही चुका पाहणार आहोत, ज्या तुम्हीही करू नका.
चहा पिणाऱ्यांनी या चुका टाळा...
न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये यासंबंधित बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. चहा प्रेमींनी या तीन चुका टाळाव्यात, असं किरण यांनी सांगितलं आहे.
पहिली चूक -
चहा गाळण्यासाठी अनेक घरांमध्ये प्लास्टिकच्या गाळणीचा वापर केला जातो. मात्र हे धोकादायक ठरू शकतं. प्लास्टिकच्या गाळणीतील प्लास्टिक कंपाऊंड्स गाळणीत येतात. यातून शरीराला आरोग्यासंबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिक गाळणी व्यतिरिक्त स्टीलच्या गाळणीचा वापर कराल.
नक्की वाचा - Healthiest Fruit: कोणतं फळ रोज खाल्लं पाहिजे? आहारतज्ज्ञांचा सल्ला काय?
दुसरी चूक -
चहा वारंवार गरम करून पिऊ नये. ही एक मोठी चूक ठरू शकते. चहा वारंवार गरम केल्याने यातील अॅसिडचं कंटेट वाढतं. यातून पोटोसंबंधित त्रास विशेषत: अॅसिडिटीसारखा त्रास उद्भवू शकतो. यासाठी चहा वारंवार गरम करून पिऊ नका. नेहमी ताजा चहा करून प्यावा.
तिसरी चूक -
बरेसचे लोक चहा तयार करताना पातेल्यात आधी दूध घालतात. मात्र ही योग्य पद्धत नाही. दुधात प्रथिनं असतात, जे अँटी-ऑक्सिडेंट बाइंड करतात. अशात चहा करताना पातेल्यात आधी पाणी घालावं आणि मग चहा पावडर उकळून घ्यावी आणि शेवटी दूध घालाव.