रात्री झोपण्यापूर्वी करा ही 2 कामं, एका मिनिटामध्ये येईल झोप!

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

सुदृढ आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. बदलत्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना रात्री लवकर झोप येत नाही. कामाचा दबाव, डिजिटल डिव्हाईसचा अतिरेकी वापर आणि दिवसभरातील थकव्यानंतर अनेकांना रात्री झोप लागत नाही. त्यामुळे शरीरावर तसंच मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतात. तुम्ही झोपण्यासाठी या दोन गोष्टी केल्या तर तुम्हाला झोप लवकर येईल. त्याचबरोबर झोपेचे क्वालिटी देखील चांगली असेल. तर पाहूया तुम्हाला काय करण्याची गरज आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दीर्घ श्वास घेण्याचं तंत्र  (Deep Breathing Technique)

ध्यान केल्यानं मन शांत होतं. मानसिक समाधान मिळतं. झोपण्यापूर्वी ध्यान केलं तर तुमच्या डोक्यातील दिवसभराचा थकवा दूर होतो. मन तणावमुक्त होतं. ध्यान केल्यानं मज्जातंतूंना आराम मिळतो, त्यामुळे लवकर झोप लागते. दीर्घ श्वास घेण्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर केला तर तुमचं शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. या तंत्रामुळे शरिरातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. डोकं शांत करतं. तणाव आणि अस्वस्थता दूर होते. ध्यान करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. 

  • एका ठिकाणी शांत बसा किंवा आडवं पडा
  • डोळे बंद करा. संथ गतीनं दीर्घ श्वास घ्या
  • नाकानं शांतपणे दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या पोटात हवा भरा
  • श्वासावर लक्ष केंद्रीत करा आणि विचार शांत करण्याचा प्रयत्न करा
  • ध्यान करताना विचार येत असतील तर ते सोडून द्या. विचारांना शांत करण्याचा प्रयत्न करा
  • हे काम किमान 5 ते 10 मिनिटं करा

ध्यान केल्यानं झोप चांगली लागतेच. त्याचबरोबर मन:शांती आणि तणावापासूनच्या मुक्तीसाठी देखील हे आवश्यक आहे. निद्रानाशाची समस्या भेडसावणाऱ्यांसाठी ध्यान फायदेशीर आहे. 

( नक्की वाचा : Banana benefits : 1 महिने रोज केळी खाल्ली तर दूर होतील 'हे' आजार )


डिजिटल डिव्हाईसपासून दूर राहा (Limit Screen Time Before Bed)

आजकाल झोपण्यापूर्वी अनेकजण मोबाईल किंवा कॉम्पुटरवर वेळ घालवतात. त्याचा झोपेवर चुकीचा परिणाम होतो. मोबाईल आणि लॅपटॉपमधील ब्लू लाईट डोकं जागृत करते. त्यामुळे मेलाटोनिन हार्मोन (जे झोपण्यासाठी आवश्यक आहे) त्याचं प्रमाण कमी होतं. 

झोपण्यापूर्वी डिजिटल डिव्हाईल दूर ठेवणं आवश्यक आहे. झोपण्याच्या 30 मिनिटं आधी  मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही बंद करा. अन्य कामांमध्ये स्वत:ला गुंतवा. पुस्तकं वाचणं, मंद संगीत ऐकणं किंवा कुणाशी गप्पा मारणे हे उपाय करा. त्यामुळे तुमचा मेंदू आणि डोळे या दोघांनाही आराम मिळेल आणि झोप लवकर लागेल.

या उपायांचा फायदा काय?

या दोन उपायांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे सोपे आणि सुरक्षित आहेत. हे नियमित केल्यानं त्यासाठी तुमचा मेंदू आणि शरीर हळू-हळू तयार होईल. त्यामुळे झोप न लागण्याची समस्या कमी होईल. तुम्हाला शांत आणि भरपूर झोप लागेल. 

अन्य उपाय

झोपण्यापूर्वी कोमट दूध पिल्यानं झोप छान लागते.
झोपण्याची वेळ निश्चित करा. त्याचवेळी रोज झोपण्याचा प्रयत्न करा
बेडरुममधील वातावरण शांत आणि आरामदायी ठेवा

Topics mentioned in this article