Benefits of Banana : केळी हे सहज आणि सर्वत्र उपलब्ध होणारे फळ आहे. केळी हे बारा महिने मिळतात. त्याचबरोबर त्याची किंमत देखील सर्वसामान्यांना परवडणारी असते. अनेक कुटुंबांमध्ये खाण्यासाठी केळी हेच मुख्य फळ असते. सहज आणि कमी किंमतीमध्ये उपलब्ध असणारी केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फळ खाल्ल्यानं तुम्हाला तातडीनं एनर्जी मिळते. केळ्यामध्ये व्हिटॅमिन B3, B6 आणि B12 सारखे पोषक द्रव्य आहेत. हे शरीराला अत्यंत उपयोगी आहेत. रोज 1 महिने केळी खाल्ल्यानंतर काय फायदे होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1 महिना रोज केळी खाण्याचे फायदे
- 1 महिना रोज केळी खाल्ल्याचा सर्वात मोठा फायदा तुमच्या पोटाला होईल. त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल. त्याचबरोबर बद्धकोष्ठतेशी संबंधित अडचणी दूर होतात.
- त्याचबरोबर केळी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करतात. तुम्ही रोज एक केळी खात असाल तर तुमची किडनी निरोगी राहते. तसेच किडनीचे कार्य सुधारते.
- केळी तुमची प्रतिकारशक्ती सुधारते. केळ्यामध्ये मॅग्मेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. ते तुमच्या हाडांसाठी चांगले आहे. तुम्ही केळी दुधात भिजवून खाल्ले तर तुमच्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.
( नक्की वाचा : रात्रीच्या जेवणातील या चुका ठरू शकतात तुमचं वजन वाढण्याचं कारणं... )
मध्यम आकाराच्या केळीमधील पोषक तत्व
USDA नुसार एका मध्यम आकाराच्या केळ्यात कॅलरी 105, कार्बोहाइड्रेट: 27 ग्रॅम, फायबर 3 ग्रॅम, शर्करा 14 ग्रॅम, प्रोटीन 1 ग्रॅम, एकूण चरबी - 0 ग्रॅम, सोडियम - 1.18 मिलिग्रॅम, पोटॅशियम - 422 मिलीग्रॅम असतात.
स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. हा कोणत्याही योग्य उपचाराचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एनडीटीव्ही या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world