जाहिरात

Egg Pickle: अंड्याचं मसालेदार लोणचं कसं बनवाल? जाणून घ्या सोपी रेसिपी

शेवटी यात उकडलेल्या अंड्यांचे तुकडे घालून वरून गरम तिळाचे तेल टाका व हलक्या हाताने सर्व एकत्र करा.

Egg Pickle: अंड्याचं मसालेदार लोणचं कसं बनवाल? जाणून घ्या  सोपी रेसिपी

Egg Pickle Recipe: जर तुम्ही मांसाहारी जेवणाचे चहाते असाल, त्याच बरोबर तुम्हाला रोज नवीन चमचमीत खाण्याची इच्छा असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. रोजच्या जेवणात तेच उकडलेले अंडे, ऑमलेट किंवा भुर्जी खाऊन अनेकदा कंटाळा येतो. अशा वेळी तोंडाची चव बदलण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे मसालेदार लोणचे एक उत्तम पर्याय ठरते. तुम्ही म्हणाल अंड्याचे लोणचे? तर होय अंड्याचे लोणचे केले जाते. तेही स्वादिष्ट असते. तुम्ही जर का ते एकाद खाल्ले तर वारंवार ते खाण्यासाठी नक्की मागाल. 

नक्की वाचा - Health tips: तुम्हाला ही रात्री वारंवार लघवी होते? दुर्लक्ष करू नका, कारणं जाणून व्हाल हैराण

हे लोणचे चवीला जितके अप्रतिम असते, तितकेच बनवायलाही अतिशय सोपे आहे. लसूण, टोमॅटो आणि तिळाच्या तेलाचा तडका या लोणच्याची चव द्विगुणीत करतो. हे लोणचे तुम्ही चपाती, पराठा किंवा भातासोबत खाऊ शकता. यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. आधी उकडलेली अंडी घ्यावीत. त्यानंतर पाच सूखलेल्या लाल मिरच्या घ्याव्यात. त्याचबरोबर चार टोमॅटो घ्यावेत. लसूणाच्या 7 ते 8 पाकळ्या घ्याव्यात. लाल तिखट, काळीमिरी पावडर, हळद, कोथिंबीर, तिळाचे तेल, मीठ हे ही साहीत्य घ्यावे.

नक्की वाचा - Weight Loss: बाळंतपणानंतर अवघ्या 6 महिन्यात घटवलं 30 किलो वजन! नव्या मातांसाठी हे कितपत सुरक्षित?

त्यानंतर प्रथम एका कढईत थोडे तेल गरम करून घ्या. त्यात 5 सुक्या लाल मिरच्या तळून बाजूला ठेवा. त्याच तेलात 4 टोमॅटो हलके तळून घ्या आणि त्यांची साले काढून घ्या. त्यानंतर उरलेल्या तेलात 7 ते 8 लसूण पाकळ्या तळून घ्या. आता खलबत्त्यात तळलेली लाल मिरची, लसूण आणि चवीनुसार मीठ एकत्र करून बारीक वाटून घ्या. यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेले टोमॅटो घालून पुन्हा एकत्र कुटून घ्या. या पेस्टमध्ये थोडे लाल तिखट, हळद आणि काळीमिरी पावडर मिसळा. शेवटी यात उकडलेल्या अंड्यांचे तुकडे घालून वरून गरम तिळाचे तेल टाका व हलक्या हाताने सर्व एकत्र करा. तुमचे मसालेदार अंड्याचे लोणचे तयार आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com