नोकरी गेली तरीही मिळणार आर्थिक मदत, ESICच्या योजनेअंतर्गत 90 दिवसांत मिळेल 50% सॅलरी, कसा करावा अर्ज? वाचा

Atal Beemit Vyakti Kalyan Yojana: नोकरी गेल्याच्या 30 दिवसानंतर तुम्ही या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या ईएसआयसी पोर्टलवर जाऊन क्लेम करण्याची अचूक वेळ आणि नियम.

जाहिरात
Read Time: 2 mins
"ईएसआईसी अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना"
file photo

Atal Beemit Vyakti Kalyan Yojana: ईएसआयसी (ESIC) च्या अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत (Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) नोकरी सुटल्यास कर्मचाऱ्याला 90 दिवसांपर्यंत त्यांच्या सरासरी वेतनाचा 50 टक्क्यांपर्यंत आर्थिक लाभ मिळतो. ही योजना अशा पात्र कर्मचाऱ्यांसाठी आहे, ज्यांनी किमान एक वर्ष काम केले आहे आणि ज्यांचे ESI योगदान सातत्याने जमा झाले आहे. ही मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते आणि यासाठी ईएसआयसी पोर्टलवर अर्ज केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना नेमकी काय आहे आणि यासाठी कसा अर्ज केला जाऊ शकतो.

अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना काय आहे? | Atal Beemit Vyakti Kalyan Yojana

अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना हा ईएसआय कायदा,1948 च्या कलम 2(9)अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक फायदेशीर उपाययोजना आहे, ज्याअंतर्गत त्यांना आयुष्यात एकदा 90 दिवसांपर्यंत मदत निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत नोकरी सुटल्यास 90 दिवसांपर्यंत 50 टक्के सॅलरी म्हणजेच सरासरी वेतनाची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांचे वेतन 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे किमान एक वर्षापासून ESI शी जोडलेले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा : बँक खाते रिकामे करणारा नवा गेम! डीपफेक आणि AI च्या जाळ्यात भारतीय ग्राहक कसे फसतात? पाहा धक्कादायक अहवाल)

योजनेची वैशिष्ट्ये आणि पात्रता

  • लाभ: बेरोजगार असलेल्या कालावधीत 90 दिवसांपर्यंत एकूण 50 टक्के सरासरी वेतनाचा मदत निधी.
  • पात्रता: कर्मचारी किमान 2 वर्षांपासून बीमित (ESIC नोंदणीकृत) असावा आणि त्याने बेरोजगार होण्यापूर्वीच्या कालावधींपैकी किमान 78 दिवसांचे योगदान दिलेले असावे.
  • वेळ मर्यादा: मदतीचा दावा बेरोजगार झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांनंतर केला जाऊ शकतो.
  • कोणाला लाभ मिळणार नाही: जर नोकरीवरून बडतर्फ केले असेल, गुन्हेगारी प्रकरण असेल किंवा स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली असल्यामुळे बेरोजगारी आली असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अर्ज कसा करावा?

1. ESICच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेसाठीचा ऑनलाइन फॉर्म भरा.
3. यासोबतच फॉर्मचं प्रिंटआउट काढून, आधार कार्ड आणि बँक खात्याच्या प्रतीसह (झेरॉक्स) जवळच्या ESIC शाखेत जमा करावी लागेल.

Topics mentioned in this article