Cancer : मद्यपान कमी केलं तर कर्करोगाचा धोका कमी होतो? डोळ्यात अंजन घालणारा TATA चा अभ्यास समोर

कमी मद्यपान केलं तरीही तोंडाच्या कर्करोगाचा धोका, टाटाच्या अभ्यासातून मोठी बातमी समोर

जाहिरात
Read Time: 2 mins

Risk of oral cancer : दारू पिऊ नको कॅन्सर होईल, असा सल्ला प्रत्येक मद्यपीला दिला जातो. यातून भीतीने काहीजण दारू पिणं बंद करतात तर काहीजणं दारूचं प्रमाण कमी करतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होईल असं त्यांना वाटतं. यामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा मेमोरियल सेंटरने केलेल्या एका अभ्यासातून महत्त्वाचा निष्कर्ष आला आहे. 

मद्यपानाचं प्रमाण कमी केलं तरीही तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा निष्कर्ष समोर आला आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खासघर सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीने यासंदर्भात एक अभ्यास केला होता. त्यातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, दररोज कमी प्रमाणात मद्यपान केलं तरी तोंडाचा, विशेषत: गालाच्या आतल्या भागातील कॅन्सरचा धोका सुमारे ५० टक्क्यांनी वाढतो. त्यातही महुआ, ताडी, देशी दारू या मद्यांचा धोका सर्वाधिक असल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - Weight Loss : 1 किलो फॅट बर्न करण्यासाठी दररोज किती चालावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त फॉर्म्युला

...तर कर्करोगाचा धोका चार पट

२०१० ते २०११ या काळात गालाच्या आतल्या भागातील म्हणजेच बक्कल म्युकोसाच्या कॅन्सरचं निदान झालेल्या १,८०३ रुग्णांची तुलना १,९०३ निरोगी व्यक्तींशी करण्यात आली. यात ११ विदेशी आणि ३० स्थानिक मद्यप्रकारांचा समावेश होता. मद्यपान आणि तंबाखू या दोन्हीचं व्यसन असेल तर तोंडाच्या कर्करोगाचा धोका पाच पटीने वाढतो.

Advertisement

तोंडाच्या कॅन्सरचा वाढता धोका...

भारतात तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तोंडाचा कर्करोग हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. दरवर्षी जवळपास १,४३,७५९ तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण आढळतात., तर ७९,९७९ मृत्यू या आजारामुळे होतात. भारतात तोंडाच्या कॅन्सरचा प्रमुख प्रकार हा गालांच्या आणि ओठांच्या आता आतील मऊ गुलाबी आवरणाचा आहे.