Mango Price : 3 लाखात एक 1 किलो आंबा; कोणतं फळ सर्वात महाग? देशातील सर्वात उत्कृष्ट दर्जाचा आंबा कोणता?

Expensive Varieties Of Mango In India: भारतात आंबा हा फळांचा राजा मानला जातो. मात्र काही आंब्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Expensive Varieties Of Mango In India
Pexels

Expensive Varieties Of Mango In India: भारतात आंबा हा फळांचा राजा मानला जातो. मात्र काही आंब्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आंबा केवळ चवीसाठी नाही तर दुर्मीळ,  गुणवत्ता आणि वेगळेपणामुळे अत्यंत महाग असतात. जाणून घेऊया या खास आंब्यांबाबत...

मियाजाकी आंबा (Miyazaki Mango)

मियाजाकी आंबा जगातील सर्वात महागड्या आंब्यांपैकी एक आहे. हा जपानमधील एक विशेष प्रकार आहे. मात्र आता भारतात काही शेतकरीही या आंब्याचं उत्पादन घेतात. याचा रंग गडद लाल असतो आणि चवीला अत्यंत गोड. या आंब्याची किंमत ३ लाख रुपये प्रति किलो असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे याला लग्झरी फळही म्हटलं जातं. 

Advertisement

हापूस आंबा  (Alphonso Mango)

अल्फान्सो आंबा किंवा हापूस आंबा भारतातील सर्वात प्रिमियम आंबा मानला जातो. विशेषत: महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि देवगड भागातील हापूस आंब्याची सर्वाधिक मागणी असते. हा आंबा अत्यंत गोड आणि चवदार असतो. बाजारात हापूस आंब्याची किंमत साधारण आंब्यापेक्षा जास्त महाग असते. या आंब्याची पेटी ८ हजार ते दहा हजारांपर्यंत येते. एका पेटीत कधी ४ ते ६ डझन आंबे असतात. 

नूरजहाँ आंबा  (Noorjahan Mango)

नूरजहाँ आंबादेखील आपल्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. मध्य प्रदेशातील अलीराजपूरमध्ये मिळणारा हा आंबा मोठ्या आकारासाठी चर्चेत असतो. एका फळाचं वजन तीन किलोंपर्यंत असतो. या एका आंब्याची किंमत ५०० ते १,५०० रुपयांपर्यंत असते. 


कोहितूर आंबा   (Kohitur Mango)

पश्चिम बंगालमधील कोहितूर आंबा दुर्मीळ मानला जातो. याचं उत्पादन कमी प्रमाणात केलं जातं. वेगळ्या पद्धतीने याची काळजी घेतली जाते. याच कारणामुळे हा आंबा बाजारात सहज मिळत नाही आणि कोहितूरच्या एका आंब्याची किंमत ५०० ते १५०० रुपयांपर्यत असल्याचं सांगितलं जातं. 

केसर आंबा (Kesar Mango)

केसर आंबा गुजरातची ओळख आहे. याचा रंग हलकासा केशरी असते आणि या आंब्याचा सुगंध सुंदर येतो. हा आंबा खायलाही चवदार असतो. या आंब्याची किंमत २०० ते ५०० रुपये प्रति किलो असतो. 

Advertisement