- लसूण सोलण्यासाठी कोमट पाण्यात पाच ते पंधरा मिनिटे भिजविल्यास साल मऊ होऊन सहज निघते
- काचेच्या बरणीत लसूण पाकळ्या जोरात हलवल्याने घर्षणामुळे साल आणि पाकळ्या वेगळ्या होतात
- सुती कापडात लसूण गुंडाळून बेलनाने हलक्या दाबाने लाटल्यास साल ढिली होऊन सोलायला सोपे होते
Fastest Way To Peel Garlic: स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी आणि आरोग्यासाठी लसूण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, लसूण सोलणे हे गृहिणींसाठी सर्वात कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम असते. लसूण सोलण्यासाठी बराच वेळ लागतो. पण जर तुम्हाला किलोवारी लसूण काही मिनिटांत सोलायचा असेल, तर काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला विश्वास पटणार नाही पण या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही काही मिनिटातच किलोभर लसूण काही क्षणात सोलून मोकळ्या व्हाल.
जारचा वापर:
- लसणाच्या पाकळ्या एका काचेच्या बरणीत भरून ती जोरजोरात हलवावी. यामुळे घर्षणामुळे सालं आणि पाकळ्या वेगळ्या होतात.
कोमट पाण्याचा वापर:
- लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. यामुळे वरची साल मऊ होऊन सहजपणे निघते.
बेलन किंवा टॉवेल:
- लसणाच्या पाकळ्या एका सुती कापडात गुंडाळून त्यावर लाटण्याने (बेलन) हलकेच दाबावे. यामुळे सालं ढिली होतात.
मायक्रोवेव्ह:
- लसूण काही सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यातील ओलावा कमी होऊन सालं कडक होतात आणि झटपट सोलली जातात.
स्वयंपाकघरात लसूण सोलायला बसलं की खूप वेळ जातो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भाजी असो वा चटणी, लसणाशिवाय चव येत नाही. पण आता काळजी करू नका. तुमच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी आम्ही वरिल भन्नाट 'जुगाड' शोधून काढला आहे. त्यामुळे तुम्ही झटपट लसूण सोलू शकला. तुमचा वेळ ही जाणार नाही शिवाय लसूण सोलण्याची मजा ही तुम्ही नक्कीच घ्याल.
झटपट लसूण सर्वात सोपी पद्धत म्हणजे लसूण कोमट पाण्यात टाकणे. 5 मिनिटे पाण्यात ठेवल्यानंतर सालं स्वतःहून निघू लागतील. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर एका डब्यात लसूण भरून तो डबा जोरात शेक करा. लसूण सोलण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मायक्रोवेव्ह. फक्त 20 ते 30 सेकंद लसूण गरम केला की सालं अलगद बाहेर येतात. या टिप्समुळे तुमच्या तासन्तासांच्या कामाचा वेळ वाचेल आणि नखांना होणारा त्रासही थांबेल.