रात्रपाळी (नाईट शिफ्ट) मध्ये काम करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. रात्रपाळीमुळे झोपेचे चक्र तर बिघडते, त्यामुळे हार्मोनस असंतुलन बिघडते, लठ्ठपणा, ऱ्हदयरोगासारखे विकार बळावतात तर प्रजनन वयोगटातील महिला व पुरुषांना वंधत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीबरोबरच कामाचे तास वाढले आहेत आणि रात्रीपाळी करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. अनेक व्यक्तींसाठी रात्रपाळी ही नित्याची झाली आहे. जरी ही करिअरची गरज वाटत असली तरी, ते तुमच्या प्रजनन आरोग्यावर दुष्परिणाम करते याचे भान ठेवणे गरजेचे आहे. सततच्या रात्रपाळीमुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकते, पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि महिलांमध्ये ओव्हुलेशनवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे कठीण होते.
काय होतो परिणाम?
रात्रीच्या शिफ्टमुळे दैनंदिन वेळापत्रकात अडथळा येतो, जो हार्मोन उत्पादन, चयापचय आणि झोपेचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविते. अनियमित झोपेच्या वेळांमुळे तणावाच्या संप्रेरकांमध्ये वाढ होते, इन्सुलिन प्रतिरोध आणि इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन सारख्या प्रजननासंबंधीत संप्रेरकांमध्ये असंतुलन होऊ शकते. यामुळे केवळ लठ्ठपणा, हृदयरोग आणि मूड स्विंग्जचा धोका वाढतो असे नाही तर ते वंध्यत्वाशी संबंधीत समस्या देखील सतावतात.
( नक्की वाचा : Salt Water Benefits: एक चिमूट मीठ पाण्यात मिसळून प्या आणि मग बघा कमाल! फायदे समजल्यावर दररोज कराल सेवन )
मेलाटोनिन हा एक हार्मोन आहे जो आपल्या झोपेसाठी खूप महत्वाचा आहे, या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे तुमची झोपेची पद्धत बदलू शकते. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये मेलाटोनिनची पातळी कमी असते, ज्यामुळे स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता खालावते .
वारंवार रात्रीच्या शिफ्टमुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि महिलांमध्ये ओव्हुलेशन प्रक्रियेवर परिणाम होतो. यापैकी अनेक जोडप्यांसाठी, एआरटी (Assisted Reproductive Technology) हा केवळ वैद्यकीय उपाय नाही तर आशेचा किरण ठरत आहे.
जितक्या लवकर तज्ञांची मदत घ्याल तितक्या लवकर यावर योग्य उपचार करता येतील. योग्य उपचारांद्वारे यावर मात करत पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करता येते अशी प्रतिक्रिया खारघरच्या मदरहुड फर्टिलिटी अँड आयव्हीएफच्या वरिष्ठ आयव्हीएफ सल्लागार डॉ. रीता मोदी यांनी व्यक्त केली.
चेंबूर येथील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. सौम्या शेट्टी सांगतात की, आमच्याकडे येणाऱ्या जोडप्यांपैकी वंधत्वाचा सामना करणाऱ्या तरुण जोडप्यांची संख्या वाढत चालली आहे. यापैकी बऱ्याच जोडप्यांपैकी एक किंवा दोन्हीही जोडीदार हे रात्रपाळी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या जोडप्यांना अस्पष्ट अशा वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे.
रात्रीच्या शिफ्टमुळे मेलाटोनिन आणि कोर्टिसोलची पातळी बिघडते, ज्याचा थेट परिणाम हा स्त्रीबीज आणि शुक्राणूंच्या आरोग्यावर होतो. सामान्य लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, थकवा, कामवासना कमी होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन, नैराश्य आणि झोपेसंबंधी समस्यांचा समावेश आहे. अशा रुग्णांसाठी, आयुआय किंवा आयव्हीसारख्या सारख्या एआरटी प्रक्रियेचा वापर करुन हार्मोनल असंतुलनावर मात करण्यास आणि गर्भधारणेची शक्यता सुधारण्यास मदत होते. याकरिता वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
नोकरदारवर्गाने आपले शारीरीक संतुलन राखणे, पुरेशी झोपेला घेणे वेळीच वैद्यकीय मदत घेणास प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रजनन उपचारांमुळे हार्मोनल समस्या दूर करण्यास मदत होते आणि निरोगी गर्भधारणेची शक्यता सुधारते. योग्य मार्गदर्शन आणि वैद्यकीय मदतीने जोडप्यांना पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे अशी प्रतिक्रिया खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समधील वरिष्ठ स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. अनुरंजिता पल्लवी यांनी व्यक्त केली.