Food News: फक्त 5 मिनिटांत ब्लड प्रेशर वाढवू शकतात 'हे' 4 पदार्थ, हे पदार्थ खाताना 100 वेळा विचार करा

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठ आणि साखर कमी असलेले अन्न खावे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Foods that Increase Blood Pressure Fast:आजच्या धकाधकीच्या जीवनात उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही एक गंभीर आणि सर्वसामान्य समस्या बनली आहे. याला 'सायलेंट किलर' असेही म्हटले जाते. कारण याची लक्षणे हळूहळू दिसतात. परंतु हृदय, किडनी आणि मेंदूवर याचा गंभीर परिणाम होतो. बऱ्याचदा, नकळत खाल्लेले काही पदार्थ अवघ्या 5 मिनिटांत रक्तदाब वाढवू शकतात. विशेषतः ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा रुग्णांनी या 4 पदार्थांपासून अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. रक्तदाब वाढल्यास डोकेदुखी, चक्कर येणे, धाप लागणे आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

नक्की वाचा -  जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत 12 हजार 500 रूपये प्रति किलो, कुठे मिळतो माहित आहे का?

रक्तदाब वाढवणारे 4 प्रमुख पदार्थ

  • चिप्स: चिप्स, शेव, भुजिया यांसारख्या स्नॅक्समध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. सोडियममुळे शरीरातील पाणी रोखले जाते. परिणामी रक्ताचे प्रमाण वाढून रक्तदाब वेगाने वाढतो. एक मूठभर नमकीन स्नॅकही लगेच परिणाम दाखवू शकतो.
  • सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ज्यूस: कोल्ड ड्रिंक्स, डबाबंद फळांचे ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि कॅफिन असते. हे पदार्थ इन्सुलिन प्रतिरोध (Insulin Resistance) आणि रक्तदाब दोन्ही वाढवतात. रिकाम्या पोटी हे पिणे अधिक धोकादायक ठरू शकते.
  • प्रोसेस्ड आणि फास्ट फूड: बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारख्या पदार्थांत सोडियम, ट्रान्स फॅट आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज (Preservatives) मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक रक्तवाहिन्या अरुंद करून रक्त प्रवाहावर दबाव वाढवतात. ज्याचा परिणाम खाल्ल्याच्या काही मिनिटांतच जाणवू शकतो.
  • जास्त गोड पदार्थ, मिठाई आणि केक: अतिरिक्त साखर घेतल्याने इन्सुलिनमध्ये मोठी वाढ (Insulin Spike) होते. ज्यामुळे रक्तदाब असंतुलित होऊ शकतो. मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हा दुहेरी धोका आहे.

नक्की वाचा - Tourism news: भारतातल्या 'या' बीचची भुरळ जर्मन व्लॉगरला, म्हणाला, 'हे' तर सेम टू सेम युरोप

धोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठ आणि साखर कमी असलेले अन्न खावे. आहारात ताजी फळे, भाज्या आणि फायबरचा समावेश करावा. नियमित व्यायाम (Wock) आणि योगा करणे, कॅफिन आणि प्रोसेस्ड फूड टाळणे, तसेच भरपूर पाणी पिणे आणि तणावापासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.