जाहिरात

Tourism news: भारतातल्या 'या' बीचची भुरळ जर्मन व्लॉगरला, म्हणाला, 'हे' तर सेम टू सेम युरोप

"इथली झाडी आणि संपूर्ण वातावरण पाहता मी भारतात आहे असे वाटतच नाहीय," असे व्लॉगर म्हणतात.

Tourism news: भारतातल्या 'या' बीचची भुरळ जर्मन व्लॉगरला, म्हणाला, 'हे' तर सेम टू सेम युरोप

German Vlogger Visited Indias Cleanest Place: जर्मनीचे प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर (Travel Vlogger) अलेक्स वेल्डर यांनी नुकताच भारत दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दक्षिण गोव्यातील गलगीबागा बीच (Galgibaga Beach) या समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. त्याचा अनुभ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. "हे ठिकाण भारतामधील आतापर्यंत पाहिलेल्या जागांपैकी सर्वात स्वच्छ आहे. मला इथे कचऱ्याचा एक तुकडाही दिसला नाही," असे मन जिंकणारे उद्गार त्यांनी काढले. व्लॉगरने या बीचची तुलना थेट युरोपमधील शांत आणि सुंदर किनाऱ्यांशी केली आहे.

'पार्टी डेस्टिनेशन'ची प्रतिमा मोडून काढणारा अनुभव
अलेक्स वेल्डर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडल (@alexweldertravels) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गोव्याकडे नेहमी 'पार्टी डेस्टिनेशन' (Party Destination) म्हणून पाहिले जाते. पण दक्षिण गोव्यातील हा भाग पूर्णपणे वेगळा आणि शांत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या बीचचा 'कासव अंडी देण्याचा परिसर' (Turtle Nesting Area) म्हणून उल्लेख करत, स्थानिक लोकांची पर्यावरणाप्रती असलेली जागरूकता आणि जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली. कचरापेट्यांची उपलब्धता पाहून ते विशेष प्रभावित झाले.

नक्की वाचा -  जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत 12 हजार 500 रूपये प्रति किलो, कुठे मिळतो माहित आहे का?

युरोपासारखे वाटणारे सौंदर्य
"इथली झाडी आणि संपूर्ण वातावरण पाहता मी भारतात आहे असे वाटतच नाहीय," असे व्लॉगर म्हणतात. हा बीच युरोपातील एखाद्या शांत किनाऱ्याप्रमाणे सुंदर आहे, असे त्यांचे मत आहे. या व्हिडिओमुळे स्वच्छता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचे सकारात्मक चित्र जगासमोर आले आहे. 'स्वच्छता ही एक जीवनशैली आहे' याचे उत्तम उदाहरण गलगीबागा बीचने दिले आहे. या बीच पाहून आपल्याला समाधान वाटले असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. 

नक्की वाचा - Two wheeler Toll: दुचाकीला टोल का द्यावा लागत नाही? 99 टक्के लोकांना कारणच माहित नाही

समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया
या व्हिडिओवर अनेक भारतीयांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने "दक्षिण गोव्याने आपली मूळची सुंदरता जपली आहे, ती कायम राहावी," अशी भावना व्यक्त केली. तर दुसऱ्याने "हा किनारा अधिक प्रसिद्ध करू नका, नाहीतर त्याची अवस्थाही बिघडेल," अशी भीती व्यक्त केली. गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. हे पर्यटक देशी जसे असतात तसेच विदेशातून ही मोठ्या प्रमाणात येत असतात. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गोव्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com