Jamun Side Effects: जांभूळ खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ, अन्यथा आरोग्याचे होईल मोठे नुकसान

Jamun Side Effects: जांभूळ खाल्ल्यानंतर कोणत्या 5 गोष्टी टाळायला हव्या, जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Black Plum Side Effects : जांभूळ खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये?"
Canva

Jamun Side Effects: सध्या जांभळाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे जांभळांची खरेदी देखील वाढली आहे. काही लोक हे फळ साध्या पद्धतीने खाणे पसंत करतात तर काही घरांमध्ये स्मूदी, भाजी किंवा हलवा यासारख्या वेगवेगळ्या पाककृतीही तयार केल्या जात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, जांभूळ खाली दिलेल्या पाच पदार्थांसोबत खाल्ल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

1. दूध

जर तुम्ही जांभूळ खाल्ल्यानंतर लगेचच दूध पीत असाल तर या दोन पदार्थांमुळे पोट फुगणे, गॅस किंवा पोटदुखी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Advertisement

2. हळदीचे पदार्थ

हळदीचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. पण जर तुम्ही जांभूळ खाल्ल्यानंतर लगेचच हळदयुक्त पदार्थ खाल्ले तर पोटात जळजळ, मळमळ किंवा पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

(नक्की वाचा: Spider Bite Treatment: कोळी चावल्यानंतर काय करावे? WHOचे Technical Advisor ने दिला महत्त्वाचा सल्ला)

3. लोणचे 

जांभूळ खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर लगेचच लोणचे खाऊ नये. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने पोटात ॲसिडिटी वाढू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ किंवा ॲसिड रिफ्लक्सचा (आंबट ढेकर येणे) त्रास होऊ शकतो.

4. तळलेले पदार्थ खाणे टाळा

सामोसे, कचोरी, भजी आणि इतर तळलेले पदार्थ पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. जांभूळ खाल्ल्यानंतर तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे आणि पोट जड होणे असे जाणवू शकते.

5. मिठाई आणि डेझर्ट

जांभूळ खाल्ल्यानंतर मिठाई किंवा जास्त साखर असलेले गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)