Stomach Health: रिकाम्या पोटी 'या' 3 गोष्टी खाणं बंद करा, पोटाचं आरोग्य कायमचं बिघडेल! डॉक्टरांचा गंभीर इशारा

Foods To Avoid On Empty Stomach: सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय टाळावे? पोटावर काय परिणाम होतो, याबाबत फोर्टिस हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वत्स्य यांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Foods To Avoid On Empty Stomach: सकाळी रिकाम्या पोटी काय खाऊ नये?"
Canva

Foods To Avoid On Empty Stomach: सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही जे खाता, त्यावरूनच बहुधा तुमच्या संपूर्ण दिवसाचा मूड ठरतो. जर तुम्ही एखादा पौष्टिक आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ला तर दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळेल. पण जर तुम्ही एखाद्या चुकीच्या पदार्थाची निवड केली तर यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमी जाणवू शकते. सोबतच पोटात जळजळ किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. म्हणूनच सकाळी पोटासाठी हेल्दी, प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की सकाळी रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाऊ नये.

फोर्टिस वसंत कुंज येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट डॉ. शुभम वत्स्य यांनी सकाळी रिकाम्या पोटी काय खाऊ नये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  

Advertisement

येथे पाहा व्हिडीओ...

रिकाम्या पोटी कधीही या तीन गोष्टी खाऊ नका | Foods To Avoid On Empty Stomach

या तीन गोष्टींबाबत सांगताना डॉ. वत्स्य यांनी इशारा दिला, "रिकाम्या पोटी कधीही या तीन गोष्टी खाऊ नका, कारण यामुळे पोटाचे आरोग्य बिघडू शकते".

1. आंबट फळे / लिंबू पाणी

रिकाम्या पोटी आंबट फळे किंवा आंबट पदार्थ खाऊ नये, कारण यामुळे पोटाच्या आतील थरामध्ये जळजळ निर्माण होऊ शकते. परिणामी ॲसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. 

(नक्की वाचा: सावधान! दिवसभरात 4 ते 5 कप चहा पिताय? शरीरात 'या' 2 व्हिटॅमिन्सची होतेय कमतरता, डॉक्टरांची धक्कादायक माहिती)

2. ब्लॅक कॉफी 

डॉ. वत्स्य यांनी सांगितले, "ब्लॅक कॉफी ॲसिड शॉकसारखे काम करते, ज्यामुळे पोट फुगणे आणि अचानक ऊर्जा कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास शरीरात ॲसिड वाढू शकते". 

Advertisement

3. मसालेदार अन्न (तिखट/मसालेदार पदार्थ)

मसालेदार खाद्यपदार्थ पोटातील जळजळ आणि दीर्घकाळ राहणाऱ्या सुजेचे (इन्फ्लेमेशन) कारण बनू शकते. छोले-भटुरे, मिसळ पाव, पाव भाजी आणि कचोरी यासारख्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

(नक्की वाचा: High Uric Acid: हाय युरिक ॲसिड समस्या असताना प्रोटीनची कमतरता कशी दूर करावी? या 3 गोष्टी ठरतील ब्रह्मास्त्र)

Advertisement

सकाळी रिकाम्या पोटी काय खाऊ शकता?

  • भिजवलेले ड्रायफ्रूट्स (नट्स)
  • ओट्स
  • केळ
  • ब्रेड ऑम्लेट
  • इडली 
  • डोसा 
  • सफरचंद
  • दोन उकडलेली अंडी

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)