Force Urbania:आता अख्ख कुटुंब आरामात फिरवा! फोर्सची दमदार व्हॅन लॉन्च; भन्नाट फिचर्स अन् किंमत फक्त...

या लाँचसह, नवीन अर्बानिया डिलक्स सध्याच्या पिढीतील अर्बानियाची जागा घेईल आणि प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रात फोर्स मोटर्सचे मानक उत्पादन बनेल.

जाहिरात
Read Time: 3 mins

Force Urbania Deluxe: फोर्स मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक आणि अग्रगण्य ऑटोमोटिव्‍ह उत्पादक कंपनीने आज नवीन अर्बानिया डिलक्स लाँच केली. ही वेईकल तिच्‍या नेक्स्ट-जनरेशन शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्मची नवीन प्रीमियम उत्पादन श्रेणी आहे. अर्बानिया प्लॅटफॉर्मच्या यशावर आधारित नवीन अर्बानिया डिलक्स अधिक उत्कृष्ट प्रीमियम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, ज्यामध्ये प्रवाशांची सोय केंद्रस्थानी ठेवून सुधारित कामगिरी, प्रीमियम इंटीरिअर्स आणि प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. या लाँचसह, नवीन अर्बानिया डिलक्स सध्याच्या पिढीतील अर्बानियाची जागा घेईल आणि प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रात फोर्स मोटर्सचे मानक उत्पादन बनेल.

Kia Syros: किया करणार मार्केट जाम! दमदार सिरॉस EV लॉन्च, 527 KM रेंज 30 मिनिटात चार्ज; पाहा फिचर्स अन् किंमत?

Advertisement

फोर्स मोटर्सने ‘अर्बानिया डिलक्स' केली लॉन्च

भारतातील पहिले पूर्णपणे पायाभूत मोड्यूलर मोनोकॉक व्हॅन प्लॅटफॉर्म म्हणून लाँच केलेल्या अर्बानियाने प्रीमियम सामायिक प्रवासी वाहतुकीमध्ये नवीन मापदंड निर्माण केला, भारतातील बाजारपेठेत नवीन क्षेत्र स्थापन केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली. या वारशाचा विस्तार करत, नवीन अर्बानिया डिलक्स अनेक सुधारणा सादर करते, ज्या प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी तसेच प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रातील ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

नवीन अर्बानिया डिलक्सला अधिक शक्तिशाली मर्सिडीज-आधारित २.६-लीटर, फोर-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिनची ताकद देण्यात आली आहे, जे १०० किलोवॅट (१३४ एचपी) ताकद आणि ३५० एनएम टॉर्क प्रदान करते. यामुळे सुधारित पिकअप, सुलभ कामगिरी आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. केबिनला नवीन प्रीमियम इंटीरिअर थीमसह व्यापकपणे अपग्रेड करण्‍यात आले आहे, ज्यामध्ये लेदरेट सीट्स, मॅचिंग अपहोल्स्ट्री आणि आकर्षक वूड-फिनिश फ्लोअरिंगचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांच्या उत्तम सोयीसह उत्कृष्ट प्रवास वातावरण तयार होते.

नवीन अर्बानिया डिलक्समध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे, प्रत्येक प्रवाशासाठी कारसारखे ३-पॉइंट सीट बेल्ट्स दिले आहेत. यासोबत ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर एअरबॅग्ज, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) आणि इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल (ईटीडीसी) यांचा समावेश आहे, जे प्रवाशांना अधिक सुरक्षिततेची खात्री देतात.

ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक उत्‍साहवर्धक करण्यासाठी वेईकलची रिअल-टाइम माहिती देणारे टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ऑनलाइन व ऑफलाइन नेव्हिगेशन, एचडी रिव्हर्स कॅमेरा, व्हॉइस अलर्ट्स व हँड्स-फ्री ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा असलेली कस्टमाइज्ड २३ सेमी (९-इंच) एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.

Advertisement

दमदार लूक, आकर्षक फिचर्स! 

नवीन १६-इंच अलॉय व्हील्स नवीन अर्बानिया डिलक्सला रस्त्यावर प्रीमियम लूक देतात, तर पॉवरवर चालणारी स्लायडिंग फूटस्टेप प्रवाशांना सहजपणे आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मदत करते. प्रवासाचा प्रीमियम अनुभव पुढे नेण्यासाठी यात ८-स्पीकर डिजिटल थिएटर सिस्टम (डीटीएस) आणि सर्व सीट्सच्या रांगेत स्मार्टफोन सहज चार्ज करण्यासाठी इल्यूमिनेटेड यूएसबी टाइप-ए आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट्स आहेत.

नवीन अर्बानिया डिलक्सला फोर्स केअरचे पाठबळ आहे, ज्यामध्ये फोर्स मोटर्सचे प्रगत आय-पल्स टेलिमॅटिक्स प्लॅटफॉर्म, ५ वर्षे किंवा ५ लाख किमी वॉरंटी, सर्व सेन्सर्सवर ३ वर्षांची वॉरंटी आणि ३ वर्षांची रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) सुविधा समाविष्ट आहे, जी मालकीच्या संपूर्ण अनुभवादरम्यान मन:शांतीची खात्री देते. नवीन अर्बानिया डिलक्स तीन व्हीलबेसेस आणि ९+डी ते १६+डी सीटींग कॉन्फिग्युरेशन्ससह आठ सीटींग लेआउट्समध्ये संपूर्ण भारतातील फोर्स मोटर्सच्या डीलर नेटवर्कद्वारे उपलब्ध असेल. या वेईकलची सुरुवातीची किंमत २८.७० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Advertisement

Success Story: सलग 3 वेळा UPSC मध्ये फेल! मग बदलली 'ती' एक सवय अन् वयाच्या 24 व्या वर्षी झाली अधिकारी