Summer Drinks: उन्हाळ्यात बॉडी राहील 'सुपर कूल'! महागड्या ड्रिंक्सला द्या सुटी, प्या 'हे' 4 स्वस्त देशी सरबत

उन्हाळ्यात शरीराचे आरोग्य आणि 'मिनरल बॅलन्स' टिकवून ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या पारंपरिक देशी पेयांचा अवलंब करणे फायदेशीर ठरते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • राज्यासह देशभरात तापमान पन्नास अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊन नागरिकांना उष्णतेने त्रास होत आहे
  • उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होण्यासोबत सोडियम आणि पोटॅशियमसारखी महत्त्वाची खनिजेही बाहेर पडतात
  • सत्तूचे सरबत प्रोटीन आणि लोहयुक्त असून शरीराला त्वरित ऊर्जा देणारे थंड पेय मानले जाते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Best Summer Drinks: सध्या राज्यासह देशभरात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घराबाहेर पडताच उन्हाच्या तीव्र झळ सहन करावी लागत आहे. या ऋतूत अतिप्रमाणामध्ये घाम आल्यामुळे शरीरातील केवळ पाणीच कमी होत नाही, तर सोडियम आणि पोटॅशियम सारखी महत्त्वाची खनिजेही (Minerals) वाहून जातात. अनेकदा डिहायड्रेशन टाळण्यासाठी तातडीने लिंबू-पाणी किंवा मीठ-साखरेचे पाणी प्यायले जाते. यामुळे तात्पुरता आराम मिळत असला, तरी शरीरातील खनिजांचा समतोल पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी आणि उन्हाच्या तीव्र झळांपासून संरक्षण करण्यासाठी हे पुरेसे नाही. उन्हाळ्यात शरीराचे 'मिनरल बॅलन्स' राखण्यासाठी काही पारंपरिक आणि देशी पेयांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

शरीराला थंडावा देणारी 4 सर्वोत्तम देशी पेये

सत्तूचे सरबत
उत्तर भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले सत्तूचे सरबत उन्हाळ्यासाठी वरदान मानले जाते. भाजलेल्या चण्यांपासून तयार होणारे सत्तू हे प्रोटीन, लोह (Iron) आणि फायबरने समृद्ध असते. थंड पाण्यात सत्तू, भाजलेले जिरे, काळे मीठ आणि बारीक चिरलेला कांदा मिसळून हे सरबत बनवले जाते. चवीनुसार हे गोडही बनवता येते. हे पेय शरीराला त्वरित ऊर्जा देते.

Advertisement

बेलाचे सरबत (Wood Apple)
उन्हाळ्याच्या दिवसांत बेलाचे सरबत आरोग्यासाठी उत्तम टॉनिक म्हणून काम करते. बेलाच्या गरामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पोटाच्या समस्या आणि बद्धकोष्टतेचा त्रास दूर ठेवण्यासाठी हे सरबत अत्यंत फायदेशीर ठरते. शिवाय ते शरीर ही थंड ठेवते. 

ताक (मट्ठा)
दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक पिणे अमृतासमान मानले जाते. ताकामध्ये पुदिना, काळे मीठ आणि जिरे पावडर मिसळल्यास शरीराला भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम मिळते. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

लिंबू-पुदिना पाणी
साध्या लिंबू पाण्याचा ऐवजी त्यात पुदिना पानांचा रस किंवा पेस्ट वापरणे अधिक फायदेशीर ठरते. पुदिन्याचा गुणधर्म थंड असल्यामुळे लिंबातील व्हिटॅमिन-सी आणि पुदिन्याचा थंडावा मिळून शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हे पेय उष्माघातापासून रक्षण करते आणि मन ताजेतवाने ठेवते.

सध्या उन्हाने चांगलाच कहर केला असून पारा 45 अंशांच्या पुढे गेला आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. जणू आभाळातून आगीच्या ज्वाला वर्षाव करत आहेत. या कडक उन्हात चालणाऱ्या उष्ण हवेच्या लाटा थेट आपल्या शरीरावर हल्ला करतात. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होतेच, पण सोबतीला सोडियम आणि पोटॅशियम सारखे महत्त्वाचे मिनरल्स देखील शरीराबाहेर पडतात. अशा वेळी आपल्या रोजच्या आहारात ही चार देशी आणि पारंपरिक ड्रिंक्सचा समावेश केला त्याचा फायाद होता. शिवाय कोणत्या ही अन्य महागड्या एनर्जी ड्रिंक्सची गरज लागत आहे. 
 

Advertisement