Gandhi Jayanti 2025 Quotes In Marathi: महात्मा गांधी यांचे 10 प्रेरणादायी विचार तुमच्या जीवनात घडवतील मोठे बदल

Gandhi Jayanti 2025 Quotes In Marathi: महात्मा गांधी जगभरात बापू या नावानंही प्रसिद्ध होते. महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Gandhi Jayanti 2025 Quotes In Marathi: महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार"
Canva AI

Gandhi Jayanti 2025 Quotes In Marathi: आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. गांधीजींनी जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेले योगदान विसरता येणार नाही. महात्मा गांधी जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti 2025) त्यांचे प्रेरणादायी विचार (Mahatma Gandhi Quotes) जाणून घेऊया...

महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार | Gandhi Jayanti 2025 Quotes In Marathi

1. "माणूस हा स्वतःच्या विचारांनी निर्मित झालेला प्राणी आहे, जे तो विचार करतो तसा तो घडतो."-महात्मा गांधी
2. "जगामध्ये जो बदल पाहू इच्छित आहात, तो बदल आधी स्वतःमध्ये घडवून आणा."- महात्मा गांधी
3. "स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला झोकून देणे."-महात्मा गांधी

Photo Credit: Canva

4. "मानवतेवरील विश्वास गमावू नये. मानवता ही समुद्रासमान आहे. समुद्रातील काही थेंब घाण असतील तर संपूर्ण समुद्र घाण होत नाही."-महात्मा गांधी
5. "सुरुवातीस ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि तेव्हा तुम्ही जिंकाल."-महात्मा गांधी
6. "विनम्र स्वभावाने तुम्ही जगाला हादरवू शकता."-महात्मा गांधी
7. "मी कोणालाही त्यांच्या अस्वच्छ पायांसह माझ्या मनात फिरकू देणार नाही.-महात्मा गांधी

Photo Credit: Canva

8. "शक्ती शारीरिक क्षमतेने येत नाही, ती अदम्य इच्छाशक्तीने येते."-महात्मा गांधी
9. "डोळ्याच्या मोबदल्यात डोळा, संपूर्ण जग आंधळ करेल."-महात्मा गांधी
10. "गर्दीमध्ये उभे राहणे सोपे आहे, पण एकटे उभे राहण्यासाठी धैर्य लागते."-महात्मा गांधी

Advertisement

(नक्की वाचा: Gandhi Jayanti Speech : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शाळेत करा 'हे' दमदार भाषण, तुमचा पहिला क्रमांक नक्की)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)