Maghi Ganesh Jayanti 2026 Date And Shubh Muhurat: श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही 'श्री गणेश जयंती' म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्र पटीने कार्यरत असतात. Dindoripranit Creation या व्हॉट्सअॅप चॅनेलने शेअर केलेली माहिती जाणून घेऊया...
माघी गणेश जयंतीच्या काय करावे? | Maghi Ganesh Jayanti 2026
- श्री गणेशाचा नामजप दिवसभर करा.
- श्री गणेशाची मनोभावे पूजा आणि आरती करा.
- श्री गणेशाला लाल फुले आणि दुर्वा अर्पण करा.
- संध्याकाळी श्री गणेश स्तोत्राचे पठण करा.
माघी श्री गणेश जयंतीला गणपतीची पूजा कशी करावी? | Maghi Ganesh Jayanti 2026 Puja
गणपती मातीची मूर्ती आणून स्थापित करावी आणि षोडशोपचार पूजा करावी.
1. श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी पुढील प्रार्थना करावी.
- हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे.
- पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.
2. गणपतीच्या मूर्तीला अनामिकेने गंध, हळद-कुंकू लावावे. पूजा करताना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाला हळद-कुंकू वाहताना आधी हळद नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहावे. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणार्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.
3. गणपती बाप्पाला लाल रंगाचे जास्वंद किंवा लाल रंगाची अन्य फुले अर्पण करावी. विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. लाल रंगाच्या जास्वंदाकडे गणेश-तत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होतात. या तत्त्वानुसार श्री गणेशाला फुले अर्पण करताना आठ किंवा आठच्या पटीत वाहावी.
4. श्री गणेशाला दुर्वा अर्पण कराव्या. दुर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते; म्हणून श्री गणेशाला दुर्वा वाहाव्या. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो. श्री गणेशाला दुर्वा नेहमी विषम संख्येने (न्यूनतम तीन किंवा पाच, सात, 21 इत्यादी) वाहाव्या. दुर्वा कोवळ्या असाव्या.
5. श्री गणेशाला उदबत्तीने दोन वेळा ओवाळावे.
6. श्री गणेशाला हीना गंधाचे अत्तर अर्पण करावे.
7. पूजा केल्यानंतर गणेशाची आरती करावी.
8. शक्य असल्यास गणपतीच्या मूर्तीला आठ किंवा आठच्या पटीने प्रदक्षिणा घालाव्या.
(नक्की वाचा: Maghi Ganesh Jayanti 2026 Date: माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व का आहे? कशी करावी उपासना? वाचा सविस्तर माहिती)
द्रिक पंचांगातील माहितीनुसार गणेश पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आणि तिथी | Ganesha Jayanti 2026 Shubh Muhurat | Ganesha Jayanti 2026 Tithiगणेश चतुर्थी तिथी आरंभ वेळ (Chaturthi Tithi Begins) - 22 जानेवारी 2026 उत्तररात्री 02:47 AM वाजता
गणेश चतुर्थी तिथी समाप्त वेळ (Chaturthi Tithi Ends) - 23 जानेवारी 2026 उत्तररात्री 02:28 AM वाजता
गणेश जयंती 2026 पूजा मुहूर्त | Ganesha Jayanti 2026 Puja Muhurat
माध्यान्ह गणेश पूजा मुहूर्त : सकाळी 11:43 वाजेपासून ते दुपारी 01:57 वाजेपर्यंत आहे.
भाविकांना पूजा करण्यासाठी एकूण 02 तास 14 मिनिटे मिळणार आहेत.
अन्य शहरातील गणेश जयंती पूजा मुहूर्त | Ganesha Jayanti 2026 Muhurat In Other Cities
मुंबई : सकाळी 11:43 वाजेपासून ते दुपारी 01:57 वाजेपर्यंत असेल.
ठाणे : सकाळी 11:43 वाजेपासून ते दुपारी 01:57 वाजेपर्यंत असेल.
नवी मुंबई: सकाळी 11:42 वाजेपासून ते दुपारी 01:57 वाजेपर्यंत असेल.
पुणे : सकाळी 11:39 वाजेपासून ते दुपारी 01:53 वाजेपर्यंत असेल.
(नक्की वाचा: Happy Maghi Ganesh Jayanti 2026 Wishes, Greetings: बाप्पाची तुमच्यावर सदैव कृपा राहो, गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा)
गणेश जयंतीला करा हा उपाय, ऐका गुरुजी शुभम लोकरे यांनी दिलेली माहिती VIDEO
कर्जमुक्तीची उपासना, ज्योतिषाचार्य शिरिष कुलकर्णी यांनी सांगितला उपाय VIDEO
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)