भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं घरोघरी आगमन होतं. गौरी माहेरी (Gauri ganpati 2024) येते त्यामुळे गौरी येतात त्या दिवशी तिचं स्वागत केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येतं. त्यामुळे त्यांना ज्येष्ठागौरी असं म्हणतात. पहिल्या दिवशी ज्येष्ठागौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य केला जातो. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठागौरींसाठी पंचपक्वानांचा स्वयंपाक केला जातो. या दिवशी सोळा भाज्या, खीर, गोडाचे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, लाडू, चकल्या, करंजी असे विविध पदार्थ तयार केले जातात.
गौरी-गणपतींमध्ये नातं काय?
गौरीला माहेरवाशीण म्हटलं जातं. गौरी म्हणजे पार्वतीचं रूप. त्यामुळे गणपती हा गौरीचा म्हणजेच पार्वतीचा पूत्र. त्यानुसार गौरी ही गणपतीची आई आहे. परंतु राज्यातील काही भागात गौराईला गणपतीची बहीण तर काही भागात गौराईला गणपतीची बायकोदेखील मानलं जातं.
हे ही वाचा - Gauri Pujan : लाडक्या गौराईंना 16 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य का दिला जातो? 16 आकड्यामागील कारण काय?
मान्यतेनुसार, तीन-चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते. त्यामुळे माहेरी आल्यावर दोन दिवस पाहुणचार घेऊन गौरी तिसऱ्या दिवशी गणेशाला घेऊन परतते. राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या गौरी पाहायला मिळतात. काही भागात मुखवटा, फुलांच्या तर गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्याच दिवशी महाप्रसाद केला जातो.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.