जाहिरात

Kasturi Turmeric: राणी-महाराणींच्या सौंदर्याचे सीक्रेट, कस्तुरी हळद म्हणजे काय? काय आहेत फायदे? वाचा सविस्तर

Kasturi Turmeric: राण्यांच्या सौंदर्याचे गुपित असलेली 'कस्तुरी हळद' पुन्हा एकदा चर्चेत! त्वचेची कांती वाढवण्यासाठी आणि पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी कस्तुरी हळदीचे आयुर्वेदिक फायदे आणि वापर सविस्तर वाचा.

Kasturi Turmeric: राणी-महाराणींच्या सौंदर्याचे सीक्रेट, कस्तुरी हळद म्हणजे काय? काय आहेत फायदे? वाचा सविस्तर
Kasturi Turmeric: कस्तुरी हळद म्हणजे काय?
Canva

Kasturi Turmeric: त्वचा सुंदर दिसावी यासाठी महिला-पुरुषवर्ग कित्येक उपाय करतात. ग्राहकांच्या मागणीनुसार आजच्या काळात बाजारात हजारो केमिकल प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पण प्राचीन काळी जेव्हा अशी कोणतीही प्रसाधने नव्हती, तेव्हा राणी-महाराणींच्या त्वचेवर तेज कशामुळे टिकून राहायचे? याचे उत्तर दडले आहे आयुर्वेदातील एका खास औषधी वनस्पतीमध्ये, जिला आपण 'कस्तुरी हळद' म्हणून ओळखतो. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर रूचा पै यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया..

काय आहे कस्तुरी हळद? | What Is Kasturi Turmeric 

कस्तुरी हळद म्हणजे 'कर्क्युमा अरोमॅटिक' (Curcuma Aromatica) आणि इंग्रजीत 'वाइल्ड टरमेरिक' (Wild Turmeric) म्हटले जाते, ही आपण स्वयंपाकात वापरतो त्या हळदीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. ही हळद खाण्यासाठी वापरली जात नाही, पण त्वचेसाठी ती अत्यंत गुणकारी मानली जाते.

त्वचेसाठी कस्तुरी हळदीचे फायदे | Kasturi Turmeric Benefits

कस्तुरी हळदीचे गुणधर्म त्वचेला आतून पोषण देण्याचे काम करतात. याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  1. त्वचेची कांती वाढवते 
  2. पिंपल्स आणि सूज कमी करते 
  3. बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून कमी करते 
  4. टॅनिंग आणि पिग्मेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत मिळते 
  5. डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी होण्यास मदत मिळते
(नक्की वाचा: Tadgola Summer Fruit: उन्हाळ्यात ताडगोळे खाल्ल्यास काय होते? कधी खावे आणि कोणी खाऊ नये? डॉ रुचा यांनी दिली मोठी माहिती)आयुर्वेदिक दृष्टिकोन आणि उपयोग

आयुर्वेदात कस्तुरी हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात कुष्ठघ्न (त्वचाविकार दूर करणारी), वर्ण्य (रंग उजळवणारी), कंडूघ्न (खाज कमी करणारी) आणि व्रणरोपण (जखमा भरून काढणारी) असे विशेष गुणधर्म आहेत. ही वनस्पती शरीरातील रक्तदोष कमी करते आणि कफ-वात दोषांचे संतुलन राखण्यास मदत करते. म्हणूनच पारंपरिक उटणे, लेप आणि फेस पॅकमध्ये कस्तुरी हळदीचा वापर केला जात आहे. आजच्या प्रदूषित वातावरणात त्वचेचा ऑइल बॅलेन्स राखण्यासाठी आणि रासायनिक प्रसाधनांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कस्तुरी हळद हा एक सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.

(नक्की वाचा: Sapota Benefits: फक्त चवीलाच नाही, तर 'हे' स्वस्त फळ हृदयासाठी आहे वरदान; आयुष मंत्रालयानेही दिला सल्ला)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com