Kasturi Turmeric: त्वचा सुंदर दिसावी यासाठी महिला-पुरुषवर्ग कित्येक उपाय करतात. ग्राहकांच्या मागणीनुसार आजच्या काळात बाजारात हजारो केमिकल प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पण प्राचीन काळी जेव्हा अशी कोणतीही प्रसाधने नव्हती, तेव्हा राणी-महाराणींच्या त्वचेवर तेज कशामुळे टिकून राहायचे? याचे उत्तर दडले आहे आयुर्वेदातील एका खास औषधी वनस्पतीमध्ये, जिला आपण 'कस्तुरी हळद' म्हणून ओळखतो. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर रूचा पै यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया..
काय आहे कस्तुरी हळद? | What Is Kasturi Turmeric
कस्तुरी हळद म्हणजे 'कर्क्युमा अरोमॅटिक' (Curcuma Aromatica) आणि इंग्रजीत 'वाइल्ड टरमेरिक' (Wild Turmeric) म्हटले जाते, ही आपण स्वयंपाकात वापरतो त्या हळदीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. ही हळद खाण्यासाठी वापरली जात नाही, पण त्वचेसाठी ती अत्यंत गुणकारी मानली जाते.
त्वचेसाठी कस्तुरी हळदीचे फायदे | Kasturi Turmeric Benefits
कस्तुरी हळदीचे गुणधर्म त्वचेला आतून पोषण देण्याचे काम करतात. याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- त्वचेची कांती वाढवते
- पिंपल्स आणि सूज कमी करते
- बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून कमी करते
- टॅनिंग आणि पिग्मेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत मिळते
- डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी होण्यास मदत मिळते
आयुर्वेदात कस्तुरी हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात कुष्ठघ्न (त्वचाविकार दूर करणारी), वर्ण्य (रंग उजळवणारी), कंडूघ्न (खाज कमी करणारी) आणि व्रणरोपण (जखमा भरून काढणारी) असे विशेष गुणधर्म आहेत. ही वनस्पती शरीरातील रक्तदोष कमी करते आणि कफ-वात दोषांचे संतुलन राखण्यास मदत करते. म्हणूनच पारंपरिक उटणे, लेप आणि फेस पॅकमध्ये कस्तुरी हळदीचा वापर केला जात आहे. आजच्या प्रदूषित वातावरणात त्वचेचा ऑइल बॅलेन्स राखण्यासाठी आणि रासायनिक प्रसाधनांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कस्तुरी हळद हा एक सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.
(नक्की वाचा: Sapota Benefits: फक्त चवीलाच नाही, तर 'हे' स्वस्त फळ हृदयासाठी आहे वरदान; आयुष मंत्रालयानेही दिला सल्ला)

Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world