Raisins : मनुके आणि बेदाणेमधील फरक काय? आहारतज्ज्ञांनी सांगितलं आरोग्यासाठी काय फायदेशीर

Golden Raisins vs. Black Raisins : बेदाणे की काळे मनुके, काय शरीरासाठी फायदेशीर?

जाहिरात
Read Time: 2 mins
Golden Raisins vs. Black Raisins

Golden Raisins vs. Black Raisins: मनुके आरोग्यासाठी फायदेशीर असतात. सकाळच्या वेळेत रात्रभर भिजवलेले मनुके खाणे आरोग्यासाठी चांगलं असल्याचं सांगितलं जातं. मनुके दोन प्रकारचे असतात. एक काळे मनुके आणि दुसरे बेदाणे. अनेकदा या दोन्हींबाबत गोंधळ निर्माण होतो. त्याशिवाय आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे हे देखील आपण पाहणार आहोत.  आहारतज्ज्ञ दीपशिखा जैन यांनी इन्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मनुके आणि बेदाण्यांचे  शरीराला होणारे फायदे सांगितले आहेत. 


तज्त्रांनी काय सांगितलं...

व्हिडिओमध्ये आहारतज्ज्ञ सांगतात, बेदामे आणि मनुके दोन्ही शरीरासाठी चांगले असतात. दोघांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि फायबरचं प्रमाण चांगलं असतं. मात्र काळ्या मनुक्यांमध्ये याचं प्रमाण अधिक असतं. 


बेदाणे खाण्याचे फायदे (Golden Raisins Benefits)

पिवळे बेदाणे सल्फर डायऑक्साइडने सुकवला जातो. त्यामुळे याचा रंग हलका असतो. न्युट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, थायरॉडच्या रुग्णांसाठी बेदाणे फायदेशीर असतात. सकाळी रिकाम्या पोटी बेदाणे भिजवून खाल्ल्याने थायरॉइडचा स्तर संतुलित राहण्यास मदत मिळू शकते. 


काळ्या मनुकांचे फायदे (Black Raisins Benefits)

काळे मनुके आर्यनचा चांगला स्त्रोत आहे. रक्ताची कमी असल्यास दररोज ६-७ काळ्या मनुके भिजवून खाणे प्रकृतीसाठी उपयुक्त आहे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो आणि अशक्तपणा दूर होतो. 

Advertisement

वजन कमी करण्यासाठी...

वजन कमी करायचं असल्यास मनुके आणि बेदाणे डाएटमध्ये सामील करू शकता.हे नैसर्गिक साखरेचं काम  करतात आणि साखरेची क्रेविंग कमी करतं. त्वचेसाठीही हा अँटी-एजिंग पदार्थ आहे. यामधील अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकदार बनते. मात्र कितीही फायदा होत असला तरीही याचं प्रमाण मर्यादेत करावं. याशिवाय मनुके किंवा बेदाणे भिजवून खावेत. दररोज ६ ते ८ मनुके किंवा बेदाणे खाऊ शकता.   

(Health Related : Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)