Gemini AI Saree Photos Trend| Google Gemini Trend: गुगल जेमिनीच्या (Google Gemini News) नॅनो बनाना (Nano Banana) फीचरची तरुणाईमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्स गुगल जेमिनी एआय टुलच्या (Google Gemini AI Tool) माध्यमातून नवनवीन आणि आकर्षक फोटो तयार करुन ते पोस्ट करत आहेत. 3D Figurineनंतर आता गुगल जेमिनी एआयच्या रेट्रो लुक ट्रेंडने (Retro Look Image) नेटकऱ्यांना वेड लावलंय. फेसबुक, X, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यासारख्या प्लॅटफॉर्मवर युजर्स स्वतःचे Retro Image पोस्ट करत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यत सर्वांनाच रेट्रो लुक इमेज ट्रेंडने भुरळ पडलीय. गुगल जेमिनी अॅप कसे वापरायचे? रेट्रो लुक फोटो कसा तयार करायचा? तसेच आतापर्यंत कोणकोणत्या सेलिब्रिटींनी रेट्रो लुकमधील (Gemini Red Saree Trend) फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, याबाबत माहिती जाणून घेऊया...
Google Gemini AI Saree Photos Trend | Gemini 2.5 Flash AI Nano Banana| Prompt Step By Step Guide To Create Retro Red Saree Look|Marathi Actress
गुगल जेमिनी अॅपची क्रेझ | Google Gemini Trend
गुगल फ्लॅश 2.5 एआय चॅटबॉटमध्ये (Google Flash 2.5 AI) गुगल जेमिनी नॅनो बनाना एआय फीचर (Google Gemini Nano Banana AI) जोडण्यात आलंय. या फीचरच्या माध्यमातून वेगवेगळ्या लुकमधील आकर्षक फोटो युजर्स सहजरित्या तयार करत आहेत. त्यामुळे सध्या हे अॅप तरुण-तरुणींमध्ये लोकप्रिय झालंय.
प्रश्न 1: गुगल जेमिनी अॅप वापरासाठी फ्री आहे की नाही? | Google Gemini App Is Free Or Paid?
उत्तर : गुगलचे हे फीचर पूर्णतः फ्री आहे. तसेच हे अॅप वापरण्यासाठी कोणतेही विशेष प्रशिक्षण किंवा कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता नाही.
प्रश्न 2: गुगल जेमिनी एआय टुलद्वारे किती फोटो तयार करू शकतो? | Gemini Apps Limits For Google AI Subscribers
उत्तर : कंपनीने फीचरच्या वापराबाबत कोणतीही मर्यादा लादलेली नाही. तुम्ही हवे तितके आणि हवे तसे फोटो क्रीएट करू शकता.
(नक्की वाचा: Google Gemini Trend: रेट्रो इमेज ट्रेंडच्या प्रेमात पडाल, 30 सेकंदांमध्ये तयार होईल तुमचा सुंदर फोटो; जाणून घ्या प्रोसेस)
रेट्रो लुक इमेज तयार करण्यासाठी फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया| Step By Step Guide To Create Retro Saree Look
1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Gemini अॅप इन्स्टॉल करा.
2. दुसरा पर्याय म्हणजे Google AI Studioच्या वेबसाइटवरचाही तुम्ही वापर करू शकता.
3. येथे तुम्हाला Nano Banana इमेज क्रीएट करण्यासाठी पर्याय दिसेल.
4. पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कमांड किंवा Prompt शब्द टाइप करावा लागेल.
5. कमांड टाइप करण्याच्या पर्यायासह '+' आयकॉनवर क्लिक करून इमेज अपलोड करा.
6. यानंतर 'Run Ctrl Enter' बटणावर क्लिक करा.
7. तुमच्या कमांडनुसार AI इमेज तयार होईल.
8. तुमचा तयार झालेला फोटो डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर पोस्ट करा.
(नक्की वाचा: Create Your 3D Model Free: एका सेकंदात बनेल तुमचं ट्रेंडिंग 3D मॉडेल, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस)
1. अमृता धोंगडे| Amruta Dhongde
2. अक्षया गुरव | Akshayaa Gurav
3. अभिनेत्री कुंजिका | Kunjika
4. अनिता दाते केळकर| Anita Date-Kelkar
5. अश्विनी कासार| Ashwini Kasar
6. गायिका वैशाली माडे | Singer Vaishali Made
7. प्रियांका बर्वे| Priyanka Barve
8. साक्षी गांधी| Sakshee Gandhi
9. अमृता खानविलकर| Amruta Khanvilkar
10. गौरी कुलकर्णी | Gauri Kulkarni
11. मयुरी कापडणे | Mayuri Kapadane
12. स्वाती लिमये | Swati Limaye