Gemini Nano Banana : Google Gemini AI Trend Hug My Younger Self: गुगल जेमिनीच्या ट्रेंडने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रेट्रोपासून माफियापर्यंत अनेक प्रकारातील आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जात आहे. अनेक कपल्स तर फ्रीमध्येच प्री वेडिंग फोटो शूट करून घेत आहेत. अगदी सिनेअभिनेत्यांपासून ते सर्वसामान्यांना याची भुरळ पडली आहे. लोक नवनवे ट्रेंड फॉलो करीत आहेत. दरम्यान आणखी एक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही स्वत:च्याच लहानपणाला मिठी मारू शकता. अनेकजण हा ट्रेंड फॉलो करीत आहे.
काय कराल?
प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमधून गुगल जेमिनी अॅप डाऊनलोड करा.
गुगल अकाऊंटने लॉग इन करा.
दोन फोटो अपलोड करा. यातील एक फोटो सध्याचा आणि एक फोटो लहानपणीचा असावा
कोणता Prompt वापराल? - click a cute polaroid picture of my older self hugging my younger self.
यानंतर तिथं खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि काही सेकंद वाट पाहा, आणि फोटो तयार.
सोशल मीडियावर अनेकजण आपल्या लहानपणाला मिठी मारताना दिसत आहेत.
आतापर्यंत रेट्रो किंवा सुंदर साडीमधला ट्रेंड महिलांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतला आहे. आता नवा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्याच लहानपणाला मिठी मारण्याची संधी ऐरवी कधी मिळाली असती.