Google Gemini Trend: सोशल मीडियावर सध्या गुगल जेमिनी एआय ट्रेंडच्या नॅनो बनाना फीचरची क्रेझ युजर्समध्ये पाहायला मिळत आहे. युजर्स वेगवेगळे व्हायरल प्रॉम्प्ट्सचा वापर करुन स्वतःचे तसेच इतरांचेही फोटो हटके पद्धतीने एडिट करत आहेत. Google Gemini हे गुगलने विकसित केलेले एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) मॉडेल आहे. यातील नॅनो बनाना फीचरचा वापर करुन लोक साडी, पारंपरिक पोशाख, 90च्या दशकातील फिल्मी लुकमधील फोटो क्रीएट करताहेत. या फीचरद्वारे तयार केलेले फोटो अगदी वास्तवदर्शी आणि एखाद्या सिनेमातील दृश्याप्रमाणेच भासत आहेत. यामुळे सोशल मीडियावर जुन्या काळातील आठवणीही जिवंत झाल्या आहेत. दुसरीकडे युजर स्वतःसह इतरांचे फोटो एडिट करत आहेत.
'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील सुधाचे फोटो
याच टुलचा वापर करून युजर्सनी काही गंमतीशीर व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापैकी एक व्हिडीओ तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. अभिनेते सचिन पिळगांवकर यांचे 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील गाजलेले पात्र 'सुधा'चा फोटो देखील गुगल जेमिनी एआय ट्रेंडमध्ये व्हायरल झालाय. emcee_hemant नावाच्या युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकर यांचे चार सुंदर फोटो एडिट केले.
emcee_hemant शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकरांचे काळा रंग, चॉकलेटी रंग, निळा रंग, लाल रंगाच्या साडीतील फोटो अतिशय सुंदर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये युजरने दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे "तेरे प्यार में सारा आलम खो बैठे" हे सदाबहार गाणंही जोडलंय. सचिन पिळगांवकर यांचे एडिट केलेले फोटो इतके सुंदर दिसत आहेत की तुम्हीही हा व्हिडीओ वारंवार पाहाल.
(नक्की वाचा: Google Gemini AI Photo Editing Prompts: प्री वेडिंग, आवडत्या सेलिब्रिटींसोबत एडिट होईल फोटो, ट्राय करा 5 व्हायरल प्रॉम्प्ट)
सचिन पिळगांवकर यांनी स्वतः केलीय व्हिडीओवर कमेंट
मला माझ्या आईची आठवण करुन दिल्याबाबत धन्यवाद, अशी कमेट सचिन पिळगांवकर यांनी केलीय.
Photo Credit: Hemant Dalvi Instagram
(नक्की वाचा: Gemini AI Saree Photos Trend: मराठमोळ्या अभिनेत्रींचे रेट्रो साडी लुकमधील 12 अप्रतिम फोटो पाहून म्हणाल:चांद तू नभातला...)
तुम्हाला गुगल जेमिनीचा हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर खालील प्रॉम्प्ट वापरू शकता.
Gemini AI Saree Trend Prompt: “Convert this person into a retro vintage grainy but bright image, black party-wear saree, 90s film aesthetic… lighting is warm, with golden sunset tones evoking golden hour glow…”.